घरमहाराष्ट्रनाशिकदिवसा करायचे मोलमजुरी, रात्री मोटरसायकल चोरी

दिवसा करायचे मोलमजुरी, रात्री मोटरसायकल चोरी

Subscribe

९ मोटर सायकलींसह २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

मालेगाव शहरात छावणी पोलिसांच्या पथकाने केलेल्या एका कारवाईत २ अट्टल मोटारसायकल चोर जाळ्यात सापडले. पोलिसांनी या दोघांकडून ९ मोटारसायकलींसह २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघेही चोरटे दिवसा मोलमजुरी आणि रात्री वाहनचोरी करत होते.

पोलीस अधीक्षक आरती सिंग, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल व पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. काही महिन्यांपासून छावणी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस तपास सुरू होता. त्यात संशयित समाधान काशीनाथ शिंदे (रा. टिंगरी, ता. मालेगाव) व विलास उर्फ हिलाल भास्कर पवार (रा. आर्वी, मित्र नगर, ता. धुळे) हे दोघे चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी शहरात येणार असल्याची माहिती छावणी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता संशयितांनी चोरीची कबुली दिली. मोटारसायकलची नंबर प्लेट बदलणे, इंजिन नबर खाडाखोड करणे यात दोघेही तरबेज होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -