घरमनोरंजन'तारक मेहता...' मधील बबिताला मारहाण करायचा 'हा' अभिनेता

‘तारक मेहता…’ मधील बबिताला मारहाण करायचा ‘हा’ अभिनेता

Subscribe

'वेलेंटाईन्स डे'च्या दिवशी मुनमुनला चांगलीच केली होती मारहाण

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्तने प्रत्येक घरा-घरांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ साली पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये झाला. मुनमुन दत्तने इंग्रजी विषयात आपले मास्टर पुर्ण केले आहे. यावेळी तिला डॉक्टर बनायचे होते. मात्र, ती अभिनय क्षेत्राकडे वळली. मुनमुन पुण्यात राहायला होती. तेव्हा तिने फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता. यानंतर २००४ मध्ये हम सब बाराती मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ती कमल हसनच्या मुंबई एक्सप्रेसमध्ये देखील दिसली होती.

- Advertisement -

मुनमुन दत्तच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर ती बिग बॉस-७ मधील सहभागी असणारा अभिनेता अरमान कोहलीला डेटही करत होती. २००८ मध्ये अरमानला डेट करण्यास मुनमुनने सुरूवात केली होती. परंतु, नंतर दोघांचे रिलेशनशीप संपले. यावेळी मुनमुनने अरमानवर असा आरोप केला होता की, तो तिच्यासोबत चांगले वर्तवणूक करत नव्हता तसेच, तो मुनमुनशी रागात वर्तवणूक करत तिला मारहाण करायचा. अरमानने ‘वेलेंटाईन्स डे’च्या दिवशी मुनमुनला चांगलीच मारपीट केली होती.

- Advertisement -

यावेळी मुनमुनने पोलिसात अरमान विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला चांगलाच दंड देखील भरावा लागला होता. याबद्दल अभिनेत्री डॉली बिंद्राने साक्ष दिली होती.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -