घरमनोरंजनअभिनेत्री सुष्मिता सेन दिसली दुर्गापुजेत पारंपारिक नृत्य करताना

अभिनेत्री सुष्मिता सेन दिसली दुर्गापुजेत पारंपारिक नृत्य करताना

Subscribe

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने दुर्गापुजेच्या निमित्ताने पारंपारिक धुनुची नृत्याचे सादरीकरण देवीसमोर केले. यावेळी तिच्या दोनही मुली उपस्थित होत्या.

देशभर नवरात्रौत्सवाची धामधुम सुरु असताना सिने कलाकारदेखील यामध्ये मागे नाहीत. मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनदेखील नवरात्रच्या रंगात रंगल्याचे एक व्हिडिओमधून समोर आले आहे. दुर्गापुजेच्या निमित्ताने देवीसमोर पारंपारिक बंगाली नृत्य करणाऱ्या सुष्मिताचा हा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये पांढऱ्या साडीतील सुष्मिताचे रुप खुपच सुंदर दिसत आहे. यावेळी तिच्या दोन्ही मुली एलिजा णि रिने यांनीही दुर्गा पुजेमध्ये सहभागी होत नृत्याचा आनंद लुटला आहे. वयाच्या ४२ व्या वर्षातही पारंपारिक धुनुची नृत्य करणाऱ्या सुष्मिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रीय ठरत आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर असते अॅक्टीव्ह

सुष्मिता सेन आपल्या दोन मुलींसोबत हातात कुंड घेऊन देवीमातेची पूजा करत आहे. सोबतच ती मुलीलाही धुनुची नृत्य शिकवताना दिसत आहे. एलिजा आणि रिने या दोघींनीही भारतीय पेहराव केला होता. सध्या सुष्मिता रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी मीडियामध्ये मात्र तिच्या बातम्या सातत्याने दिसत असतात. तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती तिच्या चाहत्यासमोर येत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -