घरमनोरंजन'नवरी मिळे हिटलरला'; अखेर एजे आणि लीलाची जोडी आली एकत्र

‘नवरी मिळे हिटलरला’; अखेर एजे आणि लीलाची जोडी आली एकत्र

Subscribe

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. राकेशने साकारलेला AJ (अभिराम जहागीरदार) व वल्लरीने साकारलेली लीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत एजे आणि लीला ही इम्परफेक्ट जोडी एकत्र येत आहे. हो हे खरं आहे कारण एजे आणि लीलाचा साखरपुडा होत आहे.

- Advertisement -

ह्या साखरपुड्या मागची गोष्ट अशी आहे की लीलाला खात्री होती की रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्यासाठी एजेच मदत करू शकतात.

एजे विक्रांतला त्याच्या चुकीच्या वागणुकीबद्दल शिक्षा देतो आणि रेवतीची माफी मागण्यासाठी प्रवृत्त करतो.

- Advertisement -

दरम्यान, एजे एक पार्टी ठेवतो ज्यात तो लीलाशी लग्न करण्याचा त्याचा निर्णय जाहीर करतो. एजेच्या या वक्तव्याने तीनही सुना- दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या लीला ही त्यांची सासू असणार आहे या विचाराने निराश होतात.

अभिनेता राकेश बापट व अभिनेत्री वल्लरी विराज यांची जोडी प्रेक्षकांना आवडू लागली आहे.लवकरच अभिराम जहागीरदार आणि लीलाचा साखरपुडा संपन्न होणार आहे. पण ह्या दोघांचं लग्न होईल? हे पाहणे खूप रंजक असेल. जेच्या सुना ह्या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत साखरपुडा विशेष भागामध्ये हे रंजक किस्से प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -