घरमहाराष्ट्रKaruna Sharma Case : करुणा शर्मांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर

Karuna Sharma Case : करुणा शर्मांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर

Subscribe

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा गेली अनेक दिवस न्यायालयीन कोठडीत होत्या. मात्र या प्रकरणातून करुणा शर्मा यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे. २५ हजारांच्या जात मुचलक्यावर त्यांची अंबाजोगाई सत्र न्यायालयाने सुटका केली आहे.

करुणा शर्मा यांच्या वकीलांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सोमवारी अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाच सुनावणी पार पडली. मात्र सुनावणीदरम्यान कोर्टाने करुणा शर्मा यांचा जामीन अर्जावरील निकाल राखीव ठेवला होता. अखेर आज कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावर निकाल जाहीर करत करुणा शर्मा यांची सुटका केली आहे.

- Advertisement -

जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्मा आणि त्यांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे यांना परळी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी ५ सप्टेंबरला त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हापासून त्या न्यायालयीन कोठडी होत्या. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकरणात मोठी खळबळ माजली होती.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी परळीत जाऊन धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असे जाहीर केले होते. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी करुणा शर्मा यांनी परळीत येत जातीवाचक शिवीगाळ केल्याचे आरोप करत त्यांच्य़ाविरोधात अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला होता. अशा दोन्ही गुन्ह्यांची शिक्षेसाठी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या.

- Advertisement -

वर्षोनुवर्षे दंड न भरणाऱ्यांनो लोकअदालतमध्ये हजर व्हा, वाहतूक पोलिसांचे आवाहन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -