नव्या कोऱ्या रोमँटिक गाण्यासाठी सज्ज व्हा, निक शिंदे घेऊन येतोय ‘तुझा लाल दुपट्टा’

या गाण्यात युथ स्टार निक शिंदे (Nick Shinde) आणि ‘बनी’ उर्फ तृप्ती राणे (Trupti Rane) ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हे गाणं अगदी रोमँटिक असून यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत.

निखिल नमित (Nikhil Namit) आणि प्रशांत नाकती (Prashant Nakti) निर्मित ‘तुझा लाल दुपट्टा’ हे नवीन रोमँटिक गाणं लवकरच ‘नादखुळा म्युझिक’ (Nadkhula Music) या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. ब-याच विशेष कारणांमुळे हे गाणं अतिशय विशेष आहे. त्यातील पहिलं विशेष कारण म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडचा गायक नकाश अजीज (Nakash Ajij) आणि प्रशांत नाकती पहिल्यांदा एकत्र आले आहेत. नकाश अजीजने हे गाणं गायले असून त्याला साथ दिली आहे गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonavane) हिने. आणखी विशेष कारण असं की या गाण्यात युथ स्टार निक शिंदे (Nick Shinde) आणि ‘बनी’ उर्फ तृप्ती राणे (Trupti Rane) ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. हे गाणं अगदी रोमँटिक असून यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असा डान्स आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत. (New marathi romanctic song Tuza lal dupatta by prashant nakti and nick shinde)

‘तुझा लाल दुपट्टा’ या गाण्याचे बोल प्रशांत यांनी लिहिले असून संगीतही त्यांनीच दिले आहे. प्रशांत नाकती यांची गाणी जशी ऐकण्यास खूप छान वाटतात, तशीच तिला पाहण्यात देखील एक वेगळीच मजा असते. नाशिकमध्ये शूट झालेल्या या गाण्याचे दिग्दर्शन सचिन कांबळे यांनी केले आहे. म्युझिक अरेंजरची जबाबदारी संकेत गुरवने पार पाडली असून रोहित जाधव आणि स्वप्नील पाटील यांनी प्रॉडक्शनचे काम पाहिले आहे.

गेले कित्येक वर्षांच्या मिलिअनच्या परंपरेनुसार, यंदाच्या वर्षीचं ‘तुझा लाल दुपट्टा’ हे गाणं पण मिलिअन पटीने वाजणार आणि गाजणार सुध्दा याची खात्री आहे.