Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'आदिपुरूष' चित्रपटातील हनुमानाचा नवा पोस्टर प्रदर्शित

‘आदिपुरूष’ चित्रपटातील हनुमानाचा नवा पोस्टर प्रदर्शित

Subscribe

अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरूष’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. अशातच या चित्रपटाचा आणखी एक नवा पोस्टर जारी करण्यात आला आहे. ज्यात संकट मोचन हनुमानाचे विशाल रुप दाखवण्यात आले आहे.

‘आदिपुरूष’ चित्रपटातील हनुमानाचा नवा पोस्टर प्रदर्शित

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

‘आदिपुरूष’ चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे श्री हनुमानाची भूमिका साकारत आहे. नुकताच चित्रपटातील देवदत्तच्या श्री हनुमान भूमिकेतील नवा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. ज्यात संकट मोचन हनुमान हवेत उडताना दिसत आह. तसेच त्याच्या पाठीवर श्री रामाची भूमिका साकारणार प्रभास बसलेला दिसत आहे. हा नवीन पोस्ट शेअर करताना प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “प्रत्येक भक्त आनंदी असेल, जेव्हा आदिपुरुषाचे स्वागत होईल.”

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

 ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सारा तेंडुलकरचा फॅमिली फोटो व्हायरल; नेटकरी म्हणाले शुभमन कुठेयं?

- Advertisment -