घरदेश-विदेशकोणाच्याही दयेवर निवडणूक लढवत नाही, ममता बॅनर्जींना काँग्रेसने सुनावले

कोणाच्याही दयेवर निवडणूक लढवत नाही, ममता बॅनर्जींना काँग्रेसने सुनावले

Subscribe

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी 2024च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात टिप्पणी केली होती. जिथे काँग्रेस (Congress) मजबूत स्थितीत असेल तिथे आम्ही पाठिंबा देऊ, असे त्यांनी म्हटले होते. तथापि, काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया देताना, काँग्रेस कोणाच्याही दयेवर निवडणूक लढवत नाही, असे ममता बॅनर्जी यांना सुनावले आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळविल्यानंतर कायम विरोधात असलेल्या ममता बॅनर्जी यांचा सूरच बदलला आहे. जिथे काँग्रेस मजबूत असेल तिथे त्यांनी लढले पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यात काहीही गैर नाही. मात्र, काँग्रेसनेही इतर पक्षांनाही साथ द्यायला हवी. तसेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू नये, असे ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पश्चिम बंगाल राज्य सचिवालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक पराभव भाजपच्या जिव्हारी, खासदारांच्या कामकाजाचे मागवले रिपोर्ट कार्ड

पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस कोणाच्याही दयेवर निवडणूक लढवत नाही आणि त्यांचा हा गैरसमज असेल तर तो मनातून काढून टाकावा, असे त्यांनी सुनावले. अधीर रंजन चौधरी यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला सांगितले की, काँग्रेसने हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात स्वबळावर विजय मिळवला आहे. या निवडणुकांदरम्यान ममता बॅनर्जी यांनी जनतेला एकदाही सांगितले नाही की, खरा सामना भाजपा आणि काँग्रेसमध्ये आहे, त्यामुळे तुम्ही काँग्रेसलाच मतदान करा.

- Advertisement -

ममता बॅनर्जी गोव्यात काँग्रेसचा पराभव करण्यात गुंतल्या होत्या. मेघालय आणि त्रिपुरामध्येही त्यांनी असेच केले. निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी तसेच पराभूत करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला. बंगालमध्ये आम्ही ममता बॅनर्जींना पाठिंबा का देऊ, त्यांनी आम्हाला बंगालमध्ये आमचा प्रभाव त्यांनी कमी केला, असेही ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांची पूर्वी जी महत्त्व होते, ते आता राहिलेले नाही. काँग्रेसशिवाय भाजपविरुद्ध लढणे आणि जिंकणे अशक्य असल्याचे त्यांना आता लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांची वृत्ती मवाळ झाल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

सोनिया गांधींनी 2011मध्ये ममता बॅनर्जींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि विजयानंतर त्यांनी काय केले? काँग्रेसच्या दयेवर त्या सत्तेवर आल्या आणि निवडणूक जिंकून मुख्यमंत्री झाल्या, पण नंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्षाला नेस्तनाबूत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्यामुळे बंगालमध्ये भाजपची ताकद वाढली, अशी टीकाही त्यांनी केली.

बंगालमध्ये आम्ही तृणमल काँग्रेसला पाठिंबा देणार की नाही, हा वेगळा विषय आहे. याचा निर्णय हायकमांड घेईल. पण बंगालमध्ये ममता बॅनर्जींसोबत आमचा संघर्ष सुरूच आहे आणि आम्ही त्यापासून मागे हटणार नाही. आम्ही त्यांच्यावर केलेल्या आरोपांवर अजूनही ठाम आहोत, असेही अधीर रंजन चौधरी म्हणाले. ममता बॅनर्जी यांनी आधी दिल्लीत येऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन, आम्ही केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही, असे त्यांना सांगावे, अशी अटही त्यांनी घातली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -