घरमनोरंजन'देवेंद्र'कडून मदत नाही म्हणून सायरा बानो यांची 'नरेंद्र'ला साद

‘देवेंद्र’कडून मदत नाही म्हणून सायरा बानो यांची ‘नरेंद्र’ला साद

Subscribe

ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही काही झाले नसल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची साद घातली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांना कंटाळून त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. बिल्डर समीर भोजवानी याने खोटी कागदपत्रे बनवून दिलीप कुमार यांचा बंगला हडप करण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदत मागितल्यानंतरही ठोस अशी कारवाई झाली नाही, अशी माहिती सायरा बानो यांनी ट्विटवर दिलेली आहे.

काय लिहिलयं ट्विटरमध्ये

‘दिलीप कुमार यांचे वांद्रे येथील पाली हिल परिसरात बंगला आहे. बिल्डर समीर भोजवानी या जागेची खोटी कागदपत्रे तयार करुन ही जागा हडपण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, समीर भोजवानी नुकताच जेलमधून सुटला आहे. याआधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पद्म विभूषण दिलीप कुमार यांना पैसा आणि बळाचा वापर करुन धमकवण्यात येत आहे. याप्रकरणात मी तुम्हाला भेटू इच्छिते, कृपया मदत करा.’

- Advertisement -

प्रकरण काय आहे

या वर्षीच्या सुरुवातील बानो यांनी समीर भोजवानीची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटकही केली होती. भोजवानी खोटी कागदपत्रे बनवून जागा बळकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा पोलिसांना सशंय होता. त्यानुसार त्याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरातून चाकू-सुरे अशी हत्यारे मिळाली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात पोलिसांनी त्याला अटक देखील केली होती. मात्र आता तो तुरुंगातून बाहेर आलेला आहे. त्यामुळेच कदाचित सायरा बानो यांना पुन्हा एकदा भोजवानी याची भीती वाटत असावी, असा अंदाज त्यांच्या ट्विटवरुन बांधला जात आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री देखील आहेत. भूमाफियापासून पिच्छा सोडविण्यासाठी सायरा बानो यांनी पोलीस यंत्रणा आणि मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली होती. मात्र त्याचा काही परिणाम झाली की नाही? अशी शंका आता बानो यांच्या ट्विटमुळे येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -