घरमहाराष्ट्रपिंपरीत माऊली चित्रपटाचा 'शो' बंद पडल्याने प्रेक्षकांचा गोंधळ

पिंपरीत माऊली चित्रपटाचा ‘शो’ बंद पडल्याने प्रेक्षकांचा गोंधळ

Subscribe

अभिनेता रितेश देशमुख याने अभिनय केलेला 'माऊली' हा मराठी चित्रपट शेवटचा अर्धा तास राहिला असता तांत्रिक बिघाडामुळे शो बंद झाला यामुळे चिंचवडच्या कार्णीवल चित्रपट गृहात चित्रपटप्रेमींनी गोंधळ घालत दुप्पट पैशांची मागणी केली.

अभिनेता रितेश देशमुख याने अभिनय केलेला ‘माऊली’ हा मराठी चित्रपट शेवटचा अर्धा तास राहिला असता तांत्रिक बिघाडामुळे शो बंद झाला यामुळे चिंचवडच्या कार्णीवल चित्रपट गृहात चित्रपटप्रेमींनी गोंधळ घालत दुप्पट पैशांची मागणी केली. यामुळे काही काळ चित्रपट गृहात तणावाचे वातावरण होते. शो बंद पडल्याने व्यवस्थापकाने प्रेक्षकांचे तिकीटाचे पैसे परत केले आहेत.या घटनेमुळे काही काळ चित्रपट गृहात तणावाचे वातावरण होते.वेळीच चिंचवड पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने गोंधळ निवळला.

अर्धातास आधी शो बंद पडला

सविस्तर माहिती अशी की,अभिनेता रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांनी अभिनय केलेला माऊली चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी साडेपाच वाजता चिंचवडच्या कार्णीवल चित्रपट गृहात चित्रपट सुरू झाला. हा चित्रपट पाहण्यासाठी तब्बल २५० ते ३०० प्रेक्षक होते. परंतू चित्रपट संपण्याच्या अर्धातास अगोदर तांत्रिक बिघाडामुळे शो मधेच बंद झाला. त्यामुळे ऐन रंगात आलेले चित्रपट बंद झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला, प्रेक्षक संतापले. त्यांनी दुप्पट पैशांची मागणी करत चित्रपट गृहात गोंधळ घातला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. वेळीच चिंचवड पोलिसांनी येऊन हस्तक्षेप केल्याने पुढील घटना टळली.

- Advertisement -

मशीन ब्रेक डाऊन झाल्याने शो बंद झाला. २५० ते ३०० प्रेक्षकांचे पैसे परत केले आहेत. तोडफोड किंवा मारामारी झालेली नाही
– उत्कर्ष कर्णिक, व्यवस्थापक, कार्णीवल चित्रपट गृह

दरम्यान, माऊली हा चित्रपट मधेच बंद पडल्याने कार्णीवलच्या व्यस्थापकाने सर्व प्रेक्षकांचे पैसे परत केले असल्याचे सांगितले आहे. यावेळी प्रेक्षकांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतू प्रेक्षकांची मोठी संख्या असल्याने ते शक्य झाले नाही, अशी माहिती तेथील व्यवस्थापकांनी दिली.

- Advertisement -

हे वाचा –

लयभारी म्हणत रितेशच्या ‘माऊली’चं पोस्टर रिलीज

डिसेंबरमध्ये होणार माऊलीचे दर्शन

दुष्काळ जाऊ दे, आरक्षण टिकू दे – चंद्रकांतदादांचे विठ्ठलाकडे साकडे

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -