घरमनोरंजनVideo: पाकिस्तानी TikTok स्टारला दुबईत मारहाण!

Video: पाकिस्तानी TikTok स्टारला दुबईत मारहाण!

Subscribe

पाकिस्तानची टिक टॉक क्वीन हरीमा शाह नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असते. तीने सोशलमिडीयावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हरीनने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, आणि या व्हिडिओत हरिमाबरोबर जे घडलं ती घटना सांगितली आहे. सोशलमिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार समिती कक्षात टिक टॉक व्हिडिओ केल्यामुळे वादात अडकली होती. त्या ठिकाणी टिक टॉक व्हिडिओ करण्याची परवानगी कशी मिळाली याबद्दलही तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

- Advertisement -

हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी हरिमाची थट्टा केली आहे तर काहींनी हरिमाला सहानुभूती दाखवली आहे. व्हिडीओत हरिमाला धक्काबुक्की होताना दिसत आहे. एका मॉलच्या कार्यक्रमासाठी दुबईत गेली असता हरिमाला धक्काबुक्की करण्यात आली. यावर हरिमा म्हणाली, मी दुबईतील ओसिस मॉलच्या उद्घाटनाला पाहुणी म्हणून गेले होते. तिथे अनेक पाकिस्तानी मुलांनी मला धक्का दिला. शिवीगाळ केली, काहींनी तर लाथाही मारल्या. अशाच प्रकारची वागणूक स्त्रीयांना देता का? सध्या सोशल मीडियावर हरीमचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

हरिमाबरोबर या आधीही घडले असेच

या आधी हरिमासोबत अशाचप्रकारची घटना घडली होती. एका कार्यक्रमात फोटो घेण्यासाठी तरूणांनी तीला घेरलं होतं. याविषयी हरिमा म्हणाली, फोटो घेण्याच्या बहाण्याने एका मुलाने तिचा हात पकडला आणि असभ्य वर्तन करू लागला. हरिनच्या हे लक्षात येताच ती तात्काळ त्याच्यापासून दूर झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -