घरमनोरंजनपरिणीती चोप्राची 'साऊथ'मध्ये एंट्री?

परिणीती चोप्राची ‘साऊथ’मध्ये एंट्री?

Subscribe

दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' या आगामी चित्रपटात परिणीती चोप्रा झळकणार असल्याची चर्चा आहे.

परिणीती चोप्राचा नुकताच येऊन गेलेला ‘नमस्ते लंडन’ हा चित्रपट, बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटाला जरी प्रेक्षकांची पसंती मिळाली नसली तरी, परिणीतीच्या भूमिकेचं सर्व स्तरांतून कौतुक झालं. दरम्यान, सध्या रंगत असलेल्या चर्चांनुसार परिणीती चोप्रा लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शन एस.एस.राजामौली यांच्या आगामी चित्रपटात परी काम करणार असल्याची जोरदार चर्चा रंगते आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ या दोन मोठ्या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर, आता राजामौली त्यांच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून, परिणीती चोप्रा याच चित्रपटात काम करणार असल्याचं वृत्त बी-टाऊनमध्ये वाऱ्यासारखं पसरत आहे. दरम्यान, याबद्दल परिणीतीकडून अद्याप काही ठोस सांगण्यात आलं नाहीये.


वाचा : गरिबांचं वास्तव सांगणारं, ‘गली बॉय’चं Doori गाणं

राजामौलींच्या ‘आरआरआर’ या आगामी चित्रपटात तेलगू सिनेसृष्टीतील दोन प्रसिद्ध सुपरस्टार राम चरण व ज्युनिअर एनटीआर हे एकत्र काम करणार आहे. एका इंग्रजी वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, या दोन हिरोंपैकी एकासोबतच परिणीती रोमान्स करताना दिसणार आहे. आता तो नक्की कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मात्र काही काळ वाट पाहावी लागेल. ‘आरआरआर’ चित्रपटात परिणीतीची भूमिका नेमकी काय असणार आहे? परिणीतीचा त्यातील लूक कसा असणार? या सगळ्याविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता अता अधिकच ताणली गेली आहे.

- Advertisement -

परिणीतीला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ऑफर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी परिणितीला दाक्षिणात्य सुपरस्टार महेशबाबू यांच्यासोबत काम करण्याची ऑफर आली होती. महेश बाबू यांची भूमिका असलेल्या  ‘स्पाईडर’ चित्रपटासाठी परिणीतीला विचारण्यात आलं होतं. मात्र, उपलब्ध माहितीनुसार ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याकारणाने परिणीतीने ही ऑफर नाकारली होती. या पार्श्वभूमीवर आता परिणीती ‘आरआरआर’मध्ये खरंच झळकणार की ही संधी ती गमावणार? हे येणारी वेळच सांगेल.

 

View this post on Instagram

 

Royal for the royal wedding ✨ @sabyasachiofficial #PCkiShaadi

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -