घरमनोरंजनगरिबांचं वास्तव सांगणारं, 'गली बॉय'चं Doori गाणं

गरिबांचं वास्तव सांगणारं, ‘गली बॉय’चं Doori गाणं

Subscribe

गली बॉय चित्रपटाच्या Doori या नवीन गाण्यात गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरकाचं वास्तव मांडण्यात आलं आहे.

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटाची सध्या सगळीकडे हवा आहे. ‘गली बॉय’मधील आलिया आणि रणवीरचे एकाहून एक दमदार डायलॉग्ज आणि चित्रपटातील गाणी सध्या प्रत्येक तरुणाच्या तोंडावर आहेत. याआधी रिलीज झालेल्या ‘अपना टाईम आयेगा’ आणि ‘मेरे गली मैं’ या दोन गाण्यांनी तर तरूणाईला अक्षरश: वेडं करुन सोडलं आहे. रॅप आणि हिपॉप स्टाईलच्या या गाण्यांची सगळ्यांमध्येच जबरदस्त क्रेझ आहे. मात्र, उडत्या स्टाईलच्या या दोन गाण्यांपाठोपाठ हा ‘गली बॉय’मधील तिसरं गाणं रिलीज झालं आहे. ‘Doori’ (दूरी) असं या गाण्याचं टायटल असून, हेही गाणं एक रॅप साँग आहे. ‘कोई मुझको यूं बताये, क्यों ये दूरी और मजबूरी’, असे या गाण्याचे बोल असून, यामध्ये गरिबीचं भीषण वास्तव मांडण्यात आलं आहे. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वास्तवादी ‘दरी’ या ‘दूरी’ गाण्यात दाखवण्यात आली आहे.

‘गली बॉय’ची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगनेच हे Doori गाणं गायलं आहे. जावेद अख्तर यांनी गाण्याचे बोल लिहीले असून, ऋिषी रिचने या गाण्याला संगीत दिले आहे. झोपडपट्टी, फुटपाथवर राहणाऱ्या आणि गरिबीत जगणाऱ्या लोकांचे वास्तव या गाण्यात दाखवले आहे. मनात जिद्द आणि डोळ्यांत अनेक स्वप्न असूनही परिस्थितीमुळे हतबल झालेल्या या लोकांची व्यथा ‘दूरी’ गाण्यात मांडण्यात आली आहे. ‘गली बॉय’ रणवीर या लोकांचा आवाज बनल्याचं गाण्यात दाखवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सध्या हे गाणं तुफान व्हायरल होत असून, रणवीरचे चाहते या गाण्याला भरभरुन पसंती देत आहेत. चित्रपटातील पहिल्या दोन गाण्यांप्रमाणेच Doori गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार यात काहीच शंका नाही. या नव्या गाण्याप्रमाणेच आधीच्या २ गाण्यांमध्येही रणवीरनेच आपल्या आवाजाची जादू चालवली आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘गली बॉय’ चित्रपट येत्या व्हॅलेंटाईन डेला म्हणजेच १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. यानिमित्ताने आलिया भट्ट आणि रणवीर सिंग पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात एका रॅपरचा स्ट्रगलपासून ते यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवला आहे. ‘गली बॉय’ चित्रपटाची कथा आपल्या आयुष्याशी मिळती-जुळती असल्याचं रणवीरने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आता प्रत्यक्षात बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल दाखवतो? हे येणारी वेळच सांगेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -