घरमनोरंजनकोरोनामुळे शाहीर शेखच्या वडिलांची प्रकृती गंभीर; चाहत्यांना केले प्रार्थनेचे आवाहन

कोरोनामुळे शाहीर शेखच्या वडिलांची प्रकृती गंभीर; चाहत्यांना केले प्रार्थनेचे आवाहन

Subscribe

शाहीर शेखबद्दल बोलायचे झाल्यास तो टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि महाभारत यांसारख्या अनेक सीरिअल्समध्ये त्याने काम केलेय.

कोरोना विषाणूचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही, लाखो लोक या आजाराचे बळी ठरले. टीव्ही इंडस्ट्री स्टार्सही कोरोनाच्या विळख्यात भरडले जात आहे. अनेक स्टार्स आणि त्यांच्या जवळील लोकांनीही कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अशातच प्रसिद्ध वेब शो पवित्र रिश्ता २ यातील अभिनेता शाहीर शेखचे वडीलही कोरोनाशी झुंज देत आहेत.

शाहीर शेखने आपल्या वडिलांना कोरोनाची ची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचे त्याने यात सांगितले आहे. शाहीर शेखने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर आपल्या वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याने वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले आहे शिवाय आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन त्याने चाहत्यांना केलेय.

- Advertisement -

शाहीर शेख याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मित्रांनो माझे वडील व्हेंटिलेटरवर आहेत. ते कोरोनाशी लढा देत आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा जेणेकरून ते बरे होतील. शाहीर शेख याचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटवर त्याचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ वडिलांची प्रकृती लवकरात लवकर ठीक होऊ अशा शुभेच्छा करत आहेत. आतापर्यंत अनेक टीव्ही स्टार्स कोरोनाचे बळी ठरले आहेत.

- Advertisement -

शाहीर शेखबद्दल बोलायचे झाल्यास तो टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि महाभारत यांसारख्या अनेक सीरिअल्समध्ये त्याने काम केलेय. सध्या तो पवित्र रिश्ता या वेब शोमुळे चर्चेत आलाय. पवित्र रिश्ता 2 चा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला. या शोमध्ये शाहीर शेखसोबत टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत आहे. पवित्र रिश्ता 2 मध्ये शाहीर शेखच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव मानव आहे तर अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका साकारत आहे.


Unpaused Naya Safar: ‘अनपॉज्ड: नया सफर’ मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -