घरमनोरंजनआदिवासींच्या व्यथा, त्यांच्यावरील अन्याय दिसला नाही फक्त... 'जय भीम' सिनेमाच्या वादावर प्रकाश...

आदिवासींच्या व्यथा, त्यांच्यावरील अन्याय दिसला नाही फक्त… ‘जय भीम’ सिनेमाच्या वादावर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण

Subscribe

‘जय भीम’ हा तमिळ ड्रामा सिनेमा आता भाषिक वादात अडकला आहे. यामुळे दक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातयं. प्रकाश राजने ‘जय भीम’ सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. सिनेमातील एका सीनमुळे ट्वविटरवर अभिनेता प्रकाश राज ट्रेंड होताना दिसतोय. हा सीन आता सोशल मीडियावरही वादाचा विषय बनतोय. सीनमध्ये हिंदीत संवाद साधणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रकाश राज कानाखाली लगावताना दिसतायत. यावर तो व्यक्ती कानाखाली का मारली असं विचारतो तेव्हा प्रकाश राज तमिळमध्ये बोल असं खडसावून सांगतात. त्यामुळे या सीनमधील प्रकाश राज यांच्या भूमिकेवर अनेकजण नाराजी व्यक्त करतायत. तर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. अशातच आता प्रकाश राज यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.

“जय भीम सारखा सिनेमा पाहिल्यानंतर त्यांना आदिवासींच्या व्यथा दिसल्या नाहीत. अन्यायाची भीती दिसली नाही, फक्त कानशिलात लावल्याचे दिसले. एवढेच त्यांना समजले, यातून त्यांचा अजेंडा उघड होतोय. काही गोष्टींचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक आहे,” असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ज्या सीनवरून वाद झाला त्यावर बोलताना प्रकाश राज म्हणाले की, “दक्षिण भारतीयांना त्यांच्यावर हिंदी लादल्याबद्दल राग आहे का? जेव्हा एखादा तामिळ भाषिक व्यक्ती जो आरोपी आहे तो पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुद्दाम हिंदी भाषा निवडतो. हे माहित असल्याने पोलीस अधिकाऱ्याने कानशीलात लगावली, अशा वेळी तो कानाखाली लागावेल की काय करेल? असा प्रतिप्रश्न प्रकाश राज यांनी उपस्थित केला आहे. तसेच या वादावर स्पष्टीकरण देणं अर्थहीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता प्रकाश राज आणि सूर्या यांची स्टारकास्ट असलेला ‘जय भीम’ सिनेमा नुकताच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियासह अनेक ठिकाणी या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. टी.एस.गगावेल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेय. आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची कथा या सिनेमातून दाखवण्यात आली आहे. १९९३ मध्ये तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असलेला हा सिनेमा तमिळ भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. मात्र एका सीनमुळे सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये सुर्या, प्रकाश राज यांच्यासोबतच राजीशा विजयन, लिजोमोल होसे, राव रमेश आणि के मनिकंदन मुख्य भूमिकेत झळकले  आहेत.

- Advertisement -

नेमका सीन काय?

या सीनमध्ये अभिनेता प्रकाश राज हे एका व्यक्तीच्या कानाखाली लगावतात. त्यावेळी त्या व्यक्तीकडून मला का मारले, अशी विचारणा केली जाते. यावर प्रकाश राज तू हिंदीत का बोललास? अशी विचारणा करत तमिळ भाषेत बोल म्हणून सज्जड दम देतात. त्यामुळे सिनेमा आता भाषिक वादात अडकला आहे. प्रकाश राज नेहमी आपला प्रोपेगंडा चालवत आपल्य़ा विचारसरणीला चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणतात. असा आरोप करत काही युजर्सनी त्यांनी ट्रोल केलयं. त्यामुळे ट्विटरवर त्यांच्या नावाचा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

तर काही यूजर्सनी या सीनचे समर्थन केले आहे. तसेच प्रकाश राज यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. प्रकाश राज यांच्या भूमिकेला पाठींबा देत एका युजर्सने लिहिले की, हा सीन हिंदी भाषेच्या विरोधात नाही. यातील व्यक्ती हिंदी बोलून इतरांपासून वाचून पळण्याच्या विचारात असते. (प्रकाश राज यांना हिंदी भाषा समजत नाही असं दाखवलं आहे.) यावेळी प्रकाश राज त्याचा प्लॅन हेरतात आणि कानाखाली लागावत आणि तमिळमध्ये बोलण्यास सांगतात. त्यामुळे तमिळ चित्रपट निर्माते हिंदी भाषेच्याविरोधात नाहीत. असं मत त्या युजर्सने लिहिले आहे. मात्र सोशल मीडियावर या सीनचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढले जातोय.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -