घरमनोरंजनअभिनय सोडून प्रिती झिंटा झाली शेतकरी

अभिनय सोडून प्रिती झिंटा झाली शेतकरी

Subscribe

व्हिडिओमध्ये सफरचंदाची झाडे दाखवत प्रिती हिमाचलमधील सफरचंद खूप उत्तम दर्जाचे व चविष्ठ असतात असे सांगत आहे.

बॉलिवूड (bollywood) अभिनेत्री प्रिती झिंटा(preity zinta) गेले अनेक काळापासून कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सतत लाईमलाईटमध्ये असते. प्रिती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या व्यक्तीगत तसेच व्यावसायिक जीवनातील अनेक घडामोडी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सोबत शेअर करते. नुकतच प्रितीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये या व्हिडिओची तुफान चर्चा रंगली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रितीने तिच्या नवीन कामाबद्दल माहिती दिली आहे. तिने सिनेसृष्टीपासून दूर राहून कसं नवीन काम सुरू केलं आहे हे इंस्टापोस्टच्या माध्यमातून प्रिती सांगत आहे.(preity zinta making distance from bollywood and started doing farming)

प्रितीने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका सुंदर ठिकाणी दिसत आहे. अवतीभोवती प्रचंड हिरवळ असून प्रिती एका सफरचंदाच्या बागेत उभी आहे. या बागेतील सर्व फाद्या लाल-लाल सफरचंदानी भरल्या आहेत. व्हिडिओमध्ये प्रिती बोलतेय की, आता मी अधीकृतपणे शेतकरी झाली आहे. मी नेहमी इथे येईन. मी सध्या कुटुंबासोबत शिमला मध्ये एका फार्महाउसवर आली आहे. या घराभोवती चारही बाजूला सफरचंदानी भरलेली झाडे दिसत आहे. आत्ता शिमलामध्ये पाऊस पडत आहे.”

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Preity G Zinta (@realpz)

- Advertisement -

व्हिडिओमध्ये सफरचंदाची झाडे दाखवत प्रिती हिमाचलमधील सफरचंद खूप उत्तम दर्जाचे व चविष्ठ असतात असे सांगत आहे. यादरम्यान प्रितीने आपल्या लहाणपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -

हे हि वाचा – KRKला ट्विट करणे पडले महागात, मनोज वाजपेयीने ठोकला मानहानीचा दावा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -