घरमनोरंजनKRKला ट्विट करणे पडले महागात, मनोज वाजपेयीने ठोकला मानहानीचा दावा

KRKला ट्विट करणे पडले महागात, मनोज वाजपेयीने ठोकला मानहानीचा दावा

Subscribe

KRK विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कलम 500 अंतर्गत खटला दाखल  करण्यात आल आहे

बॉलिवूडचा स्वघोषीत समीक्षक कमाल आर खान (kmala r khan)म्हणजेच केआरके त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध व्यक्तीसोबत KRKने पंगा घेतल्यामुळे त्याला संकटाचा सामना करावा लागला आहे. मात्र इतके घडूनही KRK चं बेताल वागणे काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता तर त्याने अभिनेता मनोज वाजपेयीवर (manoj bajpayee )निशाणा साधला आहे. आणि यानंतर नेहमीप्रमाणेच KRK आता अडचणीत सापडला आहे. मनोज वाजपेयीने KRK विरोधात मंगळवारी इंदौर जिल्हा न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.(manoj bajpayee filed defamation complain against krk) KRK विरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून त्याच्यावर कलम 500 अंतर्गत खटला दाखल  करण्यात आल आहे अशी माहिती मनोज वाजपेयीचे वकील परेश एस.जोशी यांनी दिली आहे.

KRKने ट्विटमध्ये काय लिहलं

KRKने 26 जुलैला मनोज वाजपेयी विरोधात अपमानास्पद वक्तव्य करत सोशल मीडियावर एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने नशेडी,गंजेडी,चरशी असे अपमानास्पद शब्द वापरत टिका केली होती. मनोज वाजपेयी यांची फॅमिली मॅन 2 (family man 2)ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर केआरके म्हणाला होता की, ” मी वेबसीरिज पाहत नाही मला फालतू वेळ नाही. तुम्हा लोकांना चरसी,गंजेडी मनोज आवडतो का? तुम्हाला बॉलिवूडमधील चरसी आणि गंजेडी लोकांचा राग येतो,मग सर्वांचाच राग करा. ” यापूर्वीसुद्धा केआरेकने अभिनेता सलमान खानसोबत, अक्षय कुमारसोबत पंगा घेतला होता आणि त्याला चांगलेच महागात पडले होते.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, लिपलॉक किसचा फोटो व्हायरल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -