घरमनोरंजन'देसी गर्ल'चा रोका संपन्न

‘देसी गर्ल’चा रोका संपन्न

Subscribe

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकेन गायक निक जोनास यांचा 'रोका' नवी दिल्ली.

मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलेली अभिनेत्री प्रियांका चौप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनस या जोडीने अखेर आज विवाहापूर्वीची विधी म्हणजेच ‘रोका’ पार पडला आहे. प्रियांकाच्या रोका सोहळ्यानंतर काही वेळातच सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर वायरल झाले. या सोहळ्यात निक जोनास याचे कुटुंबीय ही उपस्थीत होते. या विधीनंतर आजरात्री एका विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थीत रहाणार असल्याचे सांगितले जातेय. लकरवच रोका विधीनंतर आता प्रियांका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

आज पहाटेपासून प्रियांकाच्या घरी कार्यक्रमाची तयारी सुरु होती. मागील अनेक दिवसांपासून प्रियांका आणि तिचा मित्र निक हे चर्चेचा विषय बनले होते. मात्र आज त्यांच्या नात्याला वेगळ नाव मिळाल आहे. प्रियांकाचा रोका विधी पार पडला असून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोका विधीनंतर दोघांच्या फॅन्सनी त्यांना भरभरुन शुभेच्छा दिल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियाकांचे लग्न सोहळा मोठ्या जल्लोशात पार पडणार आहे. प्रियांकाने अमेरिकेच्या पाहूण्यांसाठी एका हॉटेलमधील २०० रुम्स बुक केले आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -