‘रात अकेली है’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात एख क्राईम मिस्ट्री आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर विशेष छाप सोडणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी दिसणार आहे. नवाजुद्दीन बरोबर राधिका आपटे देखील या चित्रपटात झळकणार आहे. नवाजने या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.
“Naam yaad rakhiyega, inspector Jatil Yadav”. ⁰Raat Akeli Hai premieres July 31. @radhika_apte @battatawada #ShivaniRaghuvanshi @RonnieScrewvala @HoneyTrehan @RSVPMovies @MacguffinP @dirtigmanshu
#NishantDahhiya @netflixindia #RaatAkeliHai pic.twitter.com/xE7Oz3Wx2l— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) July 17, 2020
काय आहे ट्रेलरमध्ये
‘रात अकेली है’ या चित्रपटाची कथा जटिल यादव नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते. पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारली आहे. एका नेत्याचा खून झाला आहे. या खूनाच्या चौकशीची जबाबदारी जटिल यादववर सोपवण्यात आली आहे. आता हा खून कोणी केला? का केला? खरंच हा खून आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तर नवाजुद्दीन सिद्दिकी या चित्रपटात शोधणार आहे.
या चित्रपटात नवाजसोबत राधिका आपटे, स्वानंद किरकिरे, आदित्य श्रीवास्तव, तिग्मांशू धूलिया, पद्मावती राव, शिवानी रघुवंशी अशी तगडी स्टार कास्ट आहे. ३१ जुलै हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटगृह बंद असल्यामुळे या चित्रपटाने देखील ओटीटी प्लॅटफॉर्म निवडला आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा – ऑनलाईन क्लासमध्ये पॉर्न व्हिडीओ!