घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटरशिया चोर... लसीचं संशोधन चोरलं...अमेरिका, इंग्लंडचा आरोप

रशिया चोर… लसीचं संशोधन चोरलं…अमेरिका, इंग्लंडचा आरोप

Subscribe

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत रशियावर आरोप केला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप लस आलेली नाही. सर्वत्र लसीचं संशोधन सुरु आहे. यासगळ्यात रशियाने कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोना विषाणूवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली असल्याचा दावा केल्यानंतर त्यांच्यावर लसीचं संशोधन चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाने हा आरोप केला आहे.

अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडा यांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत रशियावर आरोप केला आहे. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रशियाच्या या संशोधनामुळे दिलासा व्यक्त केला जात होता. पण आता अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाने केलेल्या दाव्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होणार आहे.

- Advertisement -

APT29 या हँकिंग ग्रुपने लसीसंबंधी संशोधन करणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले करत महत्त्वाची माहिती चोरली, असा आरोप ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने केला आहे. APT29 ला Cozy Bear या नावानेही ओळखलं जातं. अहवालामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, APT29 ही रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असून कोरोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करत आहे. “कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी महत्त्वाचं काम करणाऱ्यांवर केलेल्या अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो,” असं ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर यांनी म्हटलं आहे. तर ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी मेहनत घेणाऱ्यांना रशियन गुप्तचर यंत्रणांनी अशा पद्धतीने टार्गेट करणं अमान्य असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेने दोन हॅकिंग ग्रुप हे रशियन सरकारशी संबंधित असल्याचं याआधी सांगितलं होतं. या हँकिंग ग्रुपने २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये घुसखोरी करत ईमेलची चोरी केली होती. एक Cozy Bear ग्रुप, तर दुसऱ्या ग्रुपचं नाव Fancy Bear आहे. मात्र यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगत हे आरोप फेटाळले आहेत. दरम्यान निवदेनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना संशोधन चोरीची माहिती आहे की नाही याबाबत कोणती माहिती देण्यात आलेली नाही. पण हे संशोधन चोरी करण्यासाठी मोठी रक्कम मोजली असल्याचा ब्रिटीश अधिकाऱ्यांना विश्वास आहे. गुप्तचर संस्थांचे अधिकारी चोरीच्या प्रयत्नांवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत माहिती चोरीला गेली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Sachin Pilot टीमला जोरका झटका, बंडखोर आमदार निलंबित


रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोना विषाणूवर लस बनवली असून स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचं म्हटलं होतं. चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी झाली, असा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, या लसीवर जगभरातील अनेक तज्ज्ञांनी आक्षेप घेतले आहेत.


हेही वाचा – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी घोडेबाजाराचे आरोप फेटाळले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -