घरमनोरंजनमुलीवरून राजकुमार रावला मुलांनी धू धू धुतला

मुलीवरून राजकुमार रावला मुलांनी धू धू धुतला

Subscribe

राजकुमार राव सोबत कॉलेजच्या दिवसात एक मजेशीर घटना घडली होती आणि ही घटना त्याला आजही चांगलीच लक्षात आहे.

बॉलिवूडमध्ये (bollywood) आपली वेगळी ओळख तयार करणारा अभिनेता राजकुमार रावने(rajkumar rao) आपल्या अभिनय कौशल्येच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात देखील आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. राजकुमारने नेहमी आगळ्या वेगळ्या धाटणीचे सिनेमात काम करण्याकडे लक्ष केंद्रीत केले. राजकुमार एक आउटसाईडर असूनही बॉलिवूडमध्ये आपलं प्रस्थ कायम ठेवण्यात आपली मुळे खोलवर रुजवण्यात त्याला प्रचंड यश आले आहे. आज राजकुमार साठी स्पेशल दिवस आहे. राजकुमार आज त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त राजकुमारच्या कॉलेज जीवनाशी निगडीत एका मजेशीर गोष्टीचा खुलासा करणार आहोत. (rajkumar rao was beaten up by 25 college boy because of girls)

हिंदुस्तान टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, राजकुमार राव सोबत कॉलेजच्या दिवसात एक मजेशीर घटना घडली होती आणि ही घटना त्याला आजही चांगलीच लक्षात आहे. राजकुमार राव एका अशा मुलीला डेट करत होता जीचा आधीच एक बॉयफ्रेंड होता. ऐकेदिवशी राजकुमार आणि त्या मुलीच्या अफेयर बाबत तीच्या बॉयफ्रेंडला कळाले आणि तब्बल 25 मुलांनी राजकुमारला धू-धू धुतला राजकुमारवर अभिनयामागे इतका वेडा होता की त्याने भला मोठा मुलांचा घोळका मारहाण करताना देखील माझ्या चेहऱ्यावर नका मारू,मला अभिनेता व्हायचंय आहे. असा आरडा-ओरड करत होता.

- Advertisement -

राजकुमारने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 11 वी कॉलेजमध्ये प्रवेश केला. या दरम्यान एका मुलीला पाहताच क्षणी राजकुमार घायाळ झाला. ती मुलगी कॉलेजच्या मैदानात बास्केटबॉल खेळत होती. त्या क्षणी राजकुमरच्या समोर कुछ-कुछ होता हैं मधील काही सीन डोळ्यांपूढे तरंगू लागले. त्यावेळी राजकुमारला वाटले की अंजली भेटली. मात्र ती मुलगी पहिलेच अमन सोबत होती.

राजकुमार म्हणाला जेव्हा तीच्या प्रियकराला कळाले तो मला मारण्यासाठी धावून आला, त्यापैकी कोणीतरी ओरडत होते की, बंदूक काढा,मारुन टाका याला.. यादरम्यान माझे मित्र मला वाचवण्यासाठी आले. मित्र म्हणाले याला नका मारू आम्हाला मारा. राजकुमराला त्याच्या कॉलेजच्या दिवसातील आठवणी सागताना हसून-हसून पूरता बेहाल झाला होता.

- Advertisement -

हे हि वाचा – जॅकलीन फर्नांडिस याआधीही अडकली होती वादाच्या भोवऱ्यात !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -