घरमनोरंजनजॅकलीन फर्नांडिस याआधीही अडकली होती वादाच्या भोवऱ्यात !

जॅकलीन फर्नांडिस याआधीही अडकली होती वादाच्या भोवऱ्यात !

Subscribe

श्रीलंकन ब्यूटी म्हणून ओळख असणारी जॅकलीन यापूर्वी देखील अनेकदा चर्चेच्या,वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

बॉलिवूड (bollywood)अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) एका मोठ्या प्रकरण अडकताना दिसत आहे. दिल्लीतील एका मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसची ई़डी चौकशी करत आहे. (Jacqueline Fernandez questioned by ED in money laundering case) याप्रकरणात सध्या जॅकलीनचा जबाब रेकॉर्ड केला जात आहे. या प्रकरणाचे कनेक्शन कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरसोबत आहे, ज्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. श्रीलंकन ब्यूटी म्हणून ओळख असणारी जॅकलीन यापूर्वी देखील अनेकदा चर्चेच्या,वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.(jacqueline fernandez most popular controversies money laundering case)

2009 साली सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या जॅकलीनने आपल्या सौंदर्याच्या जोरावर अल्पवधीत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं.

- Advertisement -

‘अलादीन’ सारख्या सिनेमानंतर जॅकलीनने अनेक  हिट चित्रपटात काम केलं आहे. अभिनेता सलमान खान सोबत किक या सिनेमातील रोमँटीक अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला.

- Advertisement -

सलमान आणि जॅकलीनच्या अफेयरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या. किक सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्यांच्या काही तरी शिजतयं असा अंदाच व्यक्त केला जात होता.

यानंतर 2008 साली जॅकलीनचे नाव रॉयल घराण्यातील राजकुमार रशिद अल – खलीफा सोबत जोडले गेले. दोघेही तब्बल 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते यानंतर त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्या अश्या बातम्या समोर येत होत्या.

बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक साजीद खान सोबत रोमँटीक रिलेशनमध्ये जॅकलीन अनेक वर्ष होती. दोघांच नातं अगदी खास आणि घट्ट होतं. मात्र 2013 मध्ये काही व्यक्तीगत कारणामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.


एके दिवशी जॅकलीनला एका डांस क्लबमध्ये अज्ञात व्यक्ती सोबत स्पॉट करण्यात आलं. माहितीनूसार जॅकलीनला मुंबईमध्ये 3 बीएचके अपार्टमेंट गिफ्ट करणारा हा व्यक्ती इतर कोणी नसून अल-खलीफा होता अशी माहिती काही दिवासांनी समोर आली.


या सर्व अफेयरच्या चर्चांमध्ये जॅकलीनचा एक टॉपलेस फोटोशूट देखील प्रचंड व्हायरल झाला होता. एका सोफ्यावर जॅकलीनने अगदी ग्लॅमरस अंदाजात हे फोटोशूट केलं होतं. चाहते जॅकलनीचा हॉट अवतार पाहून पूरते घायाळ झाले होते.


हे हि वाचा – कॅटरिना -ऋतिकची जाहिरात बंद करा, Zomato नेटकऱ्यांकडून ट्रोल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -