Tuesday, May 30, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन राखी सावंतचा पती आदिलवर इराणी विद्यार्थिनीने केला बलात्काराचा आरोप; एफआयआर दाखल

राखी सावंतचा पती आदिलवर इराणी विद्यार्थिनीने केला बलात्काराचा आरोप; एफआयआर दाखल

Subscribe

राखी सावंत हिचा नवरा आदिल खान दुर्राणी याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आदिलवर आता एका इराणी विद्यार्थिनीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हैसूर येथील व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राखी सावंतचा नवरा आदिल खान दुर्रानीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे एका इराणी महिलेने आदिल खानवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन आदिलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेडून करण्यात आला आहे. म्हैसूरच्या व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आदिलविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये इराणी महिलेने सांगितले आहे की, ते दोघे म्हैसूरमध्ये एकत्र राहत होते आणि आदिलने तिला त्याच्याशी लग्न करणार असे देखील सांगितले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, महिलेने आरोप केला आहे की, पाच महिन्यांपूर्वी तिने आदिलला लग्न करण्याबाबत विचारले, तेव्हा आदिलने नकार देत अनेक महिलांसोबत असे संबंध असल्याचे सांगितले. आदिलने महिलेला धमकावून ब्लॅकमेल केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. आदिलने तिची वैयक्तिक छायाचित्रे पाठवून तिला ब्लॅकमेल केले आणि तक्रार न करण्याची धमकी दिली.

- Advertisement -

म्हैसूर पोलिसांनी आदिल खानविरुद्ध इराणी महिलेच्या तक्रारीनंतर आयपीसीच्या कलम 376, 417, 420, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आठवडाभरात आदिलविरुद्धची ही दुसरी एफआयआर आहे. नुकतेच राखी सावंतने आदिलवर अनेक गंभीर आरोप करत केस दाखल केली होती. आदिल सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. राखी सावंतच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती.

हेही वाचा – फुलराणीच्या रूपात कोण येणार? सोशल मीडियावर रंगल्या गप्पा

- Advertisement -

आदिल आणि राखी सावंत यांच्यातील दीर्घकाळ चाललेला वाद नुकताच पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. राखीने आदिलवर मारहाणीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. राखीने तिच्या जखमांचे फोटोही मीडियासमोर दाखवले होते. नंतर पोलिसांनी आदिलची चौकशी करून त्याला अटक केली. राखीने आदिलवर आणखी अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच आदिलने फसवणूक केल्याचा आरोपही राखीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल यांच्याबाबत वेगवेगळी माहिती प्रसार माध्यमांसमोर येत आहे. नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले. त्याआधी तिने तिच्या आणि आदिलच्या लग्नाची बातमी फोटोद्वारे सर्वांना दिली. पण त्यावेळी या लग्नाला आदिलकडून नकार देण्यात आला. त्यानंतर राखीच्या या प्रकरणात अभिनेता सलमान खान याने उडी घेत आदिलला समज दिल्याचे बोलले जाते. ज्यामुळे आदिलने सुद्धा या दोघांचे लग्न झाले असल्याचे प्रसार माध्यमांसमोर मान्य केले.

- Advertisment -