घरमनोरंजनरणबीर कपूरला कोरोनाची लागण

रणबीर कपूरला कोरोनाची लागण

Subscribe

नीतू कपूर यांनी सोशल मिडियावरुन स्पष्ट केले.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर याला कोरोनाची लागण झाली आहे. रणधीर कपूर यांनी रणबीर आजारी असल्याचे वृत्त सांगितले होते. रणबीरची  करोना पॉझिटिव्ह आहे की नाही याचे निदान झालेले नाही. मी सध्या शहराबाहेर आहे. त्यामुळे यावर मला जास्त काही बोलता येणार नाही. दरम्यान रणबीर किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे रणबीरला नक्की काय झाले याचे कारण स्पष्ट नव्हते. पण आता मात्र नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे. कोविड – १९ वर प्रतिबंधक लस आली असली, तरी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच आहे. कोरोनाने बॉलीवूड सृष्टीलादेखील विळखा घातला आहे. आतापर्यंत बरेच बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोना व्हायरसच्या शिकार झाले आहेत. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा अशा अनेक बॉलीवूड कलाकारांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

- Advertisement -

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर , आलिया भट्टसोबत अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय रणबीर ‘अॅनिमल’मध्ये परिणिती चोप्रा आणि अनिल कपूर यांच्यासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण मल्होत्राच्या ‘शमशेरा’ मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

हेही वाचा – ‘अवांछित’ मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर पडणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -