घरताज्या घडामोडीViral Video: नववधूच्या वेशभूषेत रानू मंडलनं गायलं कच्चा बदाम गाणं

Viral Video: नववधूच्या वेशभूषेत रानू मंडलनं गायलं कच्चा बदाम गाणं

Subscribe

एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रातोरात स्टार झालेली रानू मंडलची (Ranu Mondal) अजूनही चर्चा सुरू आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर रानू मंडला नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती नववधूच्या वेशात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती व्हायरल बंगाली गाणं ‘कच्चा बदाम’ गाताना दिसत आहे.

नववधूच्या वेशात रानू मंडलनं गायलेल्या ‘कच्चा बदाम’ गाण्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. या व्हिडिओवर लोकं भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यापूर्वीही रानू मंडलचा ‘कच्चा बदाम’ गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

- Advertisement -

दरम्यान ऑगस्ट 2019मध्ये एका रेल्वे स्टेशनवर 1972 मधील ‘एक प्यार का नगमा है’ हे गायलामुळे रानू मंडल खूप प्रकाश झोतात आली होती. ती रातोरात स्टार झाली होती. तिला पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वे स्टेशनवर एका तरुण इंजिनिअर अतींद्र चक्रवर्तीने पाहिलं होत. त्यानं रानू मंडलाचा व्हायरल सोशल मीडियावर शेअर केला होता, जो तुफान व्हायरल झाला होता. काही दिवसांत बॉलिवूडमधील लोकप्रिय संगीतकार हिमेश रेशमियाने चित्रपट ‘हैप्पी हार्डी एंड हीर’मध्ये रानू मंडलला गाण्याची संधी दिली. रानू मंडलचं हेही गाणं खूप गाजलं. एका व्हिडिओमुळे रानू मंडलचं संपूर्ण आयुष्य बदललं.

- Advertisement -

हेही वाचा – Ranbir Alia Wedding: अखेर तो क्षण आला, रणबीर-आलिया घेणार आज सात फेरे


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -