Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन MetGala 2021-हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड रणवीर सिंगच्या फॅशन समोर सर्व फिके

MetGala 2021-हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड रणवीर सिंगच्या फॅशन समोर सर्व फिके

मेट गालानंतर रणवीर च्या जुन्या फोटोंवरून मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्स बनवण्यात येत आहेत.

Related Story

- Advertisement -

सध्या सोशल मीडियावर(Social Media) मेट गाला 2021 (Met Gala 2021)रेड कार्पेटवरील हॉलिवूड(Hollywood) सेलिब्रिटींचे लूक प्रचंड व्हायरल होत असून चर्चेचा विषय झाले आहेत. कलाकारांचे मेट गालामधील लूक पाहून नेटकरी, मिम्स मेकरला आयत कोलीत मिळालयं असं म्हणायला हरकत नाही. कारण यंदाचा मेट गालाच्या रेड कार्पेटवरील लूक पाहून सर्वजन आश्चर्यचकीत झाले असून अनेकांना तर हसू देखील आवरने कठीन होऊन बसले आहे.मात्र, मेट गालाच्या या रेड कार्पेटवर झळकण्यासाठी स्टार्स आपली सर्व शक्ती पणाला लावून हटके स्टाईल करण्याचा प्रयत्त करत असतात.यामुळे सर्व माध्यमांच्या नजरा या रेड कार्पेटवरील स्टार्सचा लूक कॅमेरामध्ये टीपण्यासाठी धडपडत असतात. यंदा किम कार्दाशियन हीने आपल्या विचित्र स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. किमने परिधान केलेल्या काळ्या गाऊन लूकची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.तर सोशल मीडियावर किमवर मिम्सची बरसात होत आहे. यादरम्यान ,बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)देखील ट्रोल होत असल्याचे दिसतेय. रणवीरच्या नावेही अनेक मिम्स व्हायरल होत आहे. कारण रणवीर सिंगला त्याचा अतरंगीपणा दाखवण्यासाठी कोणत्याही मेट गालै फेस्टिवल मधील रेड कार्पेटची गरज नाहीये. रणवीर त्याच्या हटके स्टाईलने आपसूकच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो आणि ट्रोलही होतो.

रणवीरचा एयरपोर्ट लूक असो किंवा एखाद्या चित्रपट प्रमोशन दरम्यान त्याने केलेला अतरंगी अवतार असो रणवीर नेहमी काही तरी वेगळं ट्राय करण्याचा प्रयत्त करत असतो. यामुळे अनकेदा त्याला नेटकऱ्यांच्या टीकेचा देखील सामना करावा लागला आहे इतकंच नाही तर त्याचे सहकलाकार सुद्धा कधी कधी रणवीरचा लूक पाहून चकीत होतात.

- Advertisement -

मात्र रणवीर या सर्वांकडे दुर्लक्ष करत स्वत:चा हटके ट्रेन्ड सेट करण्यावर जास्त भर देत असल्याचे वेळोवेळी दिसून येते. एका यूजर्सने कमेंट करत म्हटल आहे की,बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड रणवीरला फॅशनच्या बाबतीत कोणी नाही मागे टाकू शकत. त्याच्या समोर चांगले चांगले लोक फिके आहेत.

- Advertisement -

मेट गालानंतर रणवीर च्या जुन्या फोटोंवरून मोठ्या प्रमाणात मजेशीर मिम्स बनवण्यात येत आहेत.

 


हे हि वाचा – सोनम कपूरला निर्लज्ज म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अनिल कपूरने दिले सडेतोड उत्तर म्हणाला…

- Advertisement -