‘रात्रीस खेळ चाले २’ मालिका ‘या’ दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप

'रात्रीस खेळ चाले २' ही मालिका प्रेक्षकांचा घेणार लवकरच निरोप.

ratris khel chale serial last
'रात्रीस खेळ चाले २' मालिका

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद भाग २ ला देखील दिला आहे. गूढ आणि थराराने परिपूर्ण अशी ‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून झी मराठीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखीच वाढली होती. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत होती आणि या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. तसेच दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तीरेखांनाही प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळाले. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

या दिवशी घेणार निरोप

‘रात्रीस खेळ चाले २’ ही मालिका शनिवारी, २९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचा शेवट पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे अण्णा जगाचा निरोप घेताना दिसणार आहे. पण, कसा हे पाहणे रंजक असणार आहे. तसेच ३१ ऑगस्ट पासून ‘देवमाणूस’ ही नवी मालिका झी मराठीवर सुरु होणार आहे. ही मालिका १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

किरण गायकवाड मुख्य भूमिकेत

‘देवमाणूस’ या मालिकेत लागीरं झालं जीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच शिवानी घाटके देखील या मालिकेत भूमिका साकारताना दिसणार आहे. ही एक थ्रिलर मालिका असणार आहे.


हेही वाचा – संजय दत्तला स्टेज ४ चा कॅन्सर; रुग्णालयाने दिली माहिती