घरमनोरंजनSadak 2 Trailer : पूजा भट्ट ट्रोलर्सवर भडकली

Sadak 2 Trailer : पूजा भट्ट ट्रोलर्सवर भडकली

Subscribe

नुकतेच सडक २ चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून त्याला युट्यूबवरील प्रेक्षकांनी नापसंती दर्शवल्याचे आकडे समोर येत आहेत. यासाठी हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये नंबर एकच्या जागी आला आहे. आतापर्यंत या ट्रेलरला ५० लाख हून अधिक लोकांनी डिसलाईक केले आहे. दरम्यान, या चित्रपटातील अभिनेत्री आणि भट्ट कॅम्पमधील कलाकार पूजा भट्ट हिने ट्रेलरला मिळालेल्या नापसंतीवर राग व्यक्त करत प्रेक्षकांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

काय म्हणाली पूजा भट्ट

राग, चर्चा, बदनामी, खोट, बॉयकॉट, पळा, Unfriend. ट्रेंड, सर्वात वर? का नाही? एका बोटीवर सर्वाधिक प्रवासी सामिल होण्याकरता आणखी काय हवंय. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून असे समजते की ट्रेलरला मिळालेल्या प्रतिसादावर पूजा भट्ट खुपच नाराज झाल्या आहेत.

- Advertisement -

तब्बल २७ वर्षांपूर्वी बनलेल्या सडक चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काल सडक २ चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. संजय दत्त, पूजा भट्ट, आलिया भट्ट, सिद्धार्थ रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचा मात्र अवघ्या काही तासातच सर्वाधिक नापसंती प्रेक्षकांनी दिर्शवली. चित्रपटाचे ट्रेलर यु ट्यूबवर पाहता येत असून त्याच्या असलेल्या लाईक आणि डिसलाईक पर्यायापैकी पहिल्या ६ तासांतच १०० लाईक तर १.४ मिलियन म्हणजेच १४ लाख डिसलाईक आतापर्यंत मिळाले होते. तर हे डिसलाईक आज खुपच वाढले.

- Advertisement -

हेही वाचा –

चाकरमान्यांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी टोलमाफ!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -