घरमनोरंजनजास्तीची फी घेऊनही चित्रपटामध्ये काम करण्यास दिला नकार; सनी देओलवर दिग्दर्शकांचा आरोप

जास्तीची फी घेऊनही चित्रपटामध्ये काम करण्यास दिला नकार; सनी देओलवर दिग्दर्शकांचा आरोप

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर दिग्दर्शक सुनील दर्शनने मोठा आरोप केला आहे. सुनील ने आपल्या एका मुलाखतीमध्ये सनी देओलसोबत आपल्या खराब झालेल्या संबंधांबाबत व्यक्तव्य केलं. त्यावेळी त्यांनी आरोप केला की, त्यांच्यासोबत सनी देओले फसवणूक केली आहे. सनी देओलने त्यांच्या एका चित्रपटासाठी जास्तीचे पैसे घेतले परंतु त्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं नाही.

दिग्दर्शकांनी लावला सनी देओलवर आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

- Advertisement -

आरजे सिद्घार्थ कन्ननशी बोलताना सुनील दर्शनने सांगितलं की, त्यांना आपल्या चित्रपटाला कोणतंही प्रॉपर अॅडींग न करता रिलीज करावं लागलं होतं. कारण, सनी देओलमध्येच लंडनला निघून गेले आणि परत आले नाहीत. त्यांनी सांगितल की, सनी ने माझ्यावर दबाव आणला की, मी त्यांना वचन द्यावं की, त्यांच्या करिअरच्या पुढील वाटचालीमध्ये मी त्याची मदत करावी. यामध्ये मी माझं पूर्ण एक वर्ष घालवलं. त्यांनी मला वचन दिलं की तो माझ्या दुसऱ्या चित्रपटामध्ये देखील काम करेल. त्यांनी हा चित्रपट साइन केला होता आणि यासाठी पैश्यांच्या हिशोबाची चर्चा देखील झाली होती.

सुनील दर्शन ने पुढे सांगितलं की, जेव्हा सनी देओल भारतात परत आले तेव्हा त्यांना वाटलं की, ते पुन्हा शूटसाठी येतील. परंतु असं नाही झालं. सनीने त्यावेळी चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा :

तुरुंगातून बाहेर येताच केआरकेने साधला ‘ब्रह्मास्त्र’वर निशाणा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -