घरमनोरंजनदेहविक्री करणाऱ्या महिला आरोपी नाहीत, त्यांचा नाईलाज आहे - रेणुका शहाणे

देहविक्री करणाऱ्या महिला आरोपी नाहीत, त्यांचा नाईलाज आहे – रेणुका शहाणे

Subscribe

बॉलिवूड जेष्ठ अभिनेत्री रेणुका शहाणे हिने देहविक्री करणाऱ्या महिलांबद्दल केलेल्या एका ट्विटचा विरोध केला आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांची तुलना गुन्हेगारांशी केल्यामुळे शहाणे यांनी टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेणुका शहाणे या ट्विटरवर खूप सक्रिय आहेत. महिलांविरोधी केलल्या पोस्टवर नेहेमीच शहाणे टीका करतात. नुकतेच भाजपचे नेते एम जे अकबर यांच्यावर टीकेमुळे चर्चेत असलेल्या रेणुका शहाणे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी देहविक्री करणाऱ्या महिलांचे समर्थन शहाणे यांनी केले आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने केलेल्या ट्विट शहाणे यांनी प्रत्योत्तर दिले आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांची तुलना गुन्हेगांराशी करु नका असे शहाणे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शहाणे आणि कृष्णमूर्ती यामधील सोशल मीडियावर सुरु असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.

कोण आहे सुचित्रा कृष्णमूर्ती

१९९४ मध्ये शाहरुख खान याचा एक चित्रपट आला होता. “कभी हा कभी ना” असे या चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात सुचित्रा अभिनेत्री होती. बॉलिवूडमधील दोन-तीन चित्रपटात काम केल्यानंतर सुचित्राने दिग्दर्शक शेखर कपूर याच्याशी लग्न केले होते. सुचित्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने एक ट्विट केले. “आई बरोबर बोलत होती. पैसाच सर्व काही नसतो. पैसे तर आरोपी आणि देहविक्री करणाऱ्या महिलांकडेही असतात. जर काही खरे असेल तर ते माणसाचे चरित्र आणि आत्मसन्मान. आज मी ही गोष्ट समजू शकले.”, असे तिने लिहिले होते.

- Advertisement -

काय म्हणाल्या रेणुका शहणे

सुचित्राच्या या ट्विटवर  रेणुका शहाणेने टीका केली आहे. एक नाही तर रेणुकाने चार ट्विट करुन तिला समजवण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या आईचा सन्मान करत बोलते आहे की देहविक्री करणाऱ्या महिलांची तुलना आरोपींशी करणे चुकीचे आहे. या महिला स्वतः जवळ असलेल्या वस्तूची विक्री करतात आणि आरोपी दुसऱ्याजवळच्या वस्तू हिसकावून घेतात. देहविक्री करणाऱ्या महिला अनेकदा नाईलाजाने व्यवसाय करतात. त्यांना जबरदस्तीने या कामात ढकलले जाते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -