घरमनोरंजनएस आय एम प्रोफेसर

एस आय एम प्रोफेसर

Subscribe

कलाकाराच्या इच्छेला काही सीमा नसते. नवोदित असेपर्यंत फक्त चित्रपट, मालिकेत काम मिळावे अशी त्याची इच्छा असते. पुढे अनेक मालिकेत मुख्य भूमिका निभावत असताना एखादी भूमिका कधीच आपल्या वाट्याला आलेली नाही ती आपल्या वाट्याला यावी असे त्या कलाकाराला वाटत असते. रहस्यमय मालिका म्हटली की त्यात गूढ असे काहीतरी दडलेले आहे, शोधकवृत्ती, स्वत:ला चाचपणे, सतत संभ्रमात अशी भूमिका आपल्याही वाट्याला यावी असे कलाकाराला वाटत असते. रोहित खुराना या कलाकाराने ही इच्छा व्यक्त केली आणि तंत्र या मालिकेत प्रोफेसरच्या भूमिकेतून तो आपली हौस भागवून घेणार आहे.

हिंदी कलर्स वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार तंत्र ही मालिका प्रसारित केली जाते. शिर्षकावरून यात गूढ, रहस्य काही दडलेले आहे हे लक्षात येते. सध्या जे भाग दाखवले जात आहेत त्यात सरगून कौर साकार करत असलेली नियती तंत्रमंत्राच्या तावडीतून खन्ना मेन्शनला सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत जुई परमार साकार करत असलेली सुमती तिथे येते आणि ज्या अद्भूत गोष्टी घडायला लागतात, त्याचा जो साक्षिदार असतो तो म्हणजे प्रोफेसर. ही प्रोफेसरची व्यक्तीरेखा रोहित साकारणार आहे. आजवर अनेक भूमिका केल्या पण गूढशक्तीच्या आहारी गेलेला प्रोफेसर साकार करताना वेगळाच अनुभव वाट्याला येईल, असे रोहितला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -