घरमनोरंजनतारीख ठरली! ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन पुढच्या महिन्यात!

तारीख ठरली! ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन पुढच्या महिन्यात!

Subscribe

‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित; अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार

नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाऊंटवर ‘सेक्रेड गेम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ही ‘सेक्रेड गेम्स’ची सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीची आतूरतेने वाट पाहत होते त्या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून पुन्हा एकदा सरताज सिंगला गणेश गायतोंडे आव्हान देणार आहे.

- Advertisement -

गायतोंडेचे संवाद सोशल मीडियावर सुपरहिट

ट्रेलरवरून असे लक्षात येते की, यावेळी  एंटरटेनमेंटचा डबल धमाका होणार हे मात्र नक्की. विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर या वेबसीरिजचे कथा आधारित असून या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुक केले. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ तसेच, ‘जंग का वक्त आ गया है’, असे म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे अनेक संवाद सोशल मीडियावर सुपरहिट ठरले आहे.

अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सीझनमध्ये मिळणार

यासोबतच, या सीरीजमध्ये शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संभाषण आणि दृश्याने भरलेली ही वेब सीरिज मोठ्या वादात सापडली असली तरी ती प्रसिद्ध झाली होती. परंतु, सेक्रेड गेम्सचा पुढचा सिझन केव्हा येतो आणि नेमकं मुंबईचं काय होतं, ते पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. गणेश गायतोंडेचं नेमकं काय झालं, याची प्रेक्षक वाट पाहत होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत.

- Advertisement -

१५ ऑगस्ट को कुछ बडा होने वाला है !

२५ दिवसांत काय होणार? त्रिवेदी का वाचणार? ताबुत काय असतो? अशा अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं नव्या सिझनमध्ये मिळणार आहेत. गणेश गायतोंडे, बंटी, दिलबाग सिंग, सरताज सिंग यांच्या भोवती असलेली कथा आहे. यामध्ये काय होणार हे पाहणे हा प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

नव्या सिझनमध्ये दोन नव्या कलाकारांची भर

पहिल्या भागामधील सैफ अली खान (दिलबाग सिंग), नवाजुद्दीन सिद्दीकी (गणेश गायतोंडे), जतीन सारना (बंटी), पंकज त्रिपाठी (गणेश गायतोंडेचा तिसरा अध्यात्मिक गुरु) हे कलाकार पुढच्या सिझनमध्ये ही दिसणार आहेत. त्याचसोबत अभिनेत्री कल्की कोचलीन, अभिनेता रणवीर शौरी हे दोन नवीन कलाकारांची भर पडली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -