घरमनोरंजनकरण जोहरच्या आगामी चित्रपटात सैफ अली खानचा मुलगा करणार पदार्पण

करण जोहरच्या आगामी चित्रपटात सैफ अली खानचा मुलगा करणार पदार्पण

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान सध्या त्याच्या बॉलिवूडमधील पदार्पणामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहर इब्राहिम अली खानला लॉन्च करणार आहे. याआधी देखील करण जोहरने बऱ्याच स्टारकिड्सला लॉन्च केल आहे. यामध्ये आलिया भट्ट, जान्हवी कपूर यांचा देखील सहभाग आहे. दरम्यान, इब्राहिम अली खान सध्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. याचंदरम्यान, आता इब्राहिम अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाची देखील चर्चा होऊ लागली आहे. इतकंच नव्हे तर इब्राहिम अली खानच्या या पहिल्या चित्रपटामध्ये अभिनेत्री काजोल देखील असणार आहे.

इब्राहिम अली खानसोबत दिसणार काजोल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जौहरच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्री काजोल दिसणार आहे. तसेच याच चित्रपटातून इब्राहिम अली खान देखील पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण 2023 मध्ये सुरु होणार असून हा चित्रपट काश्मीर आणि आतंकवाद या विषयावर आधारित असणार आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी काजोल खूप उत्सुक आहे. यामध्ये ती वेगळी आणि महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.

- Advertisement -

‘सलाम वेंकी’मध्ये दिसणार काजोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोल सध्या तिच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काजोल व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये विशाल जेठवा, राहुल बोस, राजीव खंडेलवाल, अहाना कुमरा आणि प्रकाश राज देखील महत्वाच्या भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपटात थोड्या वेळासाठी अमीर खान देखील दिसणार आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘पुष्पा’चित्रपटाने होणार रशियामध्ये होणाऱ्या 5व्या भारतीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -