घरमनोरंजनहा संजय दत्त आहे? कॅन्सर उपचारांदरम्यानचा फोटो व्हायरल, चाहते चिंतेत!

हा संजय दत्त आहे? कॅन्सर उपचारांदरम्यानचा फोटो व्हायरल, चाहते चिंतेत!

Subscribe

अभिनेता संजय दत्तचं नाव घेतलं की पहाडी शरीरयष्टीचा संजय दत्त आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय दत्त कॅन्सरसाठी उपचार घेत आहे. ऑगस्ट महिन्यात संजय दत्तनं आपण फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचारांसाठी कामातून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होंतं. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तनं ही घोषणा केली होती. मात्र, तेव्हापासून संजय दत्तबद्दल कोणतीही माहिती बाहेर आली नव्हती. आता संजय दत्तचा कोकिलाबेन रुग्णालयातला एक फोटो व्हायरल होऊ लागला आहे. एका फॅनसोबत या फोटोमध्ये संजय दत्त दिसत आहे. मात्र, पहाडी शरीरयष्टीऐवजी संजूबाबा या फोटोमध्ये शारिरीकदृष्ट्या कमजोर दिसत असल्यामुळे त्याचे चाहते चिंतीत झाले आहेत. निळ्या रंगाचा टीशर्ट, निळ्या रंगाची कार्गो आणि खांद्यावर लटकणारी बॅग अशा पेहेरावात संजय दत्त या फोटोमध्ये दिसत आहे. संजय दत्तच्या या फोटोनंतर त्याच्या चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरच चिंता व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

- Advertisement -

 

संजय दत्तवर सध्या मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात फुफ्फुसांच्या कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तो नियमितपणे कोकिलाबेन रुग्णालयात जात असतो. यापैकीच एका भेटीत हा फोटो काढण्यात आला आहे. संजय दत्त उपचारांसाठी अमेरिकेला जाणार असल्याचं देखील सांगितलं जात होतं. अमेरिकेचा ५ वर्षांचा व्हिसा संजय दत्तकडे आहे. मात्र, सध्या मुंबईतच तो उपचार घेत असून काही काळानंतर अमेरिकेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -