घरमनोरंजन'गंगूबाई काठियावाड़ी' तील आलियाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

‘गंगूबाई काठियावाड़ी’ तील आलियाचा फर्स्ट लूक पाहिलात का?

Subscribe

या चित्रपटात आलिया भट्ट वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळणार

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता संपणार आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच या चित्रपटातील आलिया भट्टचा फर्स्ट लूक देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गंगूबाई काठियावाड़ी’ हा चित्रपट ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटात आलिया भट्ट वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

तर आलिया भट्टने गंगूबाई काठियावाडी चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाल्यानंतर तो आलियाने इन्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फर्स्ट तिने शेअर करताना ‘गंगूबाई काठियावाडी… ३० जुलै २०२१ रोजी चित्रपटगृहात…’ असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साली यांनी दिग्दर्शित केला असून त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा संजय लीला भन्साली आणि उत्कर्षिणी वशिष्ठ यांनी लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात शांतनु माहेश्वरी, सीमा पाहवा आणि विजय राज हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. यासह अजय देवगन, इमरान हाश्मी आणि हुमा कुरेशी विशेष भूमिकेत टॉप करताना दिसणार आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -