घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांचा Lockdown व्हीप : शिवसेना नेत्याने चक्क शाही विवाह सोहळाच केला रद्द

मुख्यमंत्र्यांचा Lockdown व्हीप : शिवसेना नेत्याने चक्क शाही विवाह सोहळाच केला रद्द

Subscribe

राज्यात पुन्हा डोकं वर काढणारे कोरोनाचे संकट पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला भावनिक आवाहन करतानाच पुन्हा लॉकडाऊन हवे का ? अशी विचारणा केली होती. तसेच लॉकडाऊनसाठी राज्यातील जनतेला आठवड्याभराचा अल्टीमेटमही दिला होता. कोरोना योद्धा होता आले नाही तरीही कोरोना स्प्रेडर होऊ नका असेही मुख्यमंत्र्यांकडून आवाहन करण्यात आले होते. तसेच आपला राजकीय पक्ष वाढवा पण कोरोना नको असेही मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांचे कान टोचले होते. शिवसेना पक्षप्रमुखांच्या याच आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेनेच्या एका सच्चा कार्यकर्त्याने आपल्या मुलाचा पंचतारांकित हॉटेलमधील शाही विवाह सोहळाच रद्द करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर एका महामंडळावर सभापती म्हणून जबाबदारी असणाऱ्या शिवसेना नेत्याने पक्षाचा व्हिप पाळला आहे. आपल्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या या सच्चा शिवसैनिकाचे मुख्यमंत्र्यांनीही तोंड भरून असे कौतुक केले आहे.

शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या पुत्राचा पंचतारांकित विवाह सोहळा आता रद्द करण्यात आला आहे. हा विवाह सोहळा विलेपार्ले पूर्व एअरपोर्ट येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये 28 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यक्रम कमी जणांच्या उपस्थित साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यानुसार घोसाळकर यांनी आपले चिरंजीव सौरभ यांचा 28 फेब्रुवारीला होणारा विवाह सोहळा आता साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या विवाह सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसोबत अनेक मंत्री ,नेतेमंडळी उपस्थित राहणार होते.यासंदर्भात घोसाळकर यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत वरील निर्णय कळविला. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जानेवारीपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच चिरंजीव सौरभ घोसाळकर याचा विवाह सोहळा 28 फेब्रुवारी 2021रोजी ठरविण्यात आला. यासाठी घोसाळकर कुटुंबीयांनी जय्यत तयारी सुरू केली होती. असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -