घरमनोरंजनबघा 'संजू' मधलं आणखी एक गाणं

बघा ‘संजू’ मधलं आणखी एक गाणं

Subscribe

संजू बाबाच्या जीवनावर आधारीत ‘संजू’ या सिनेमातील आणखी एक गाण रिलीज झाले आहे. ‘कर मैदान फतेह’ असे या गाण्याचे बोल असून हे गाणं सध्या युट्युबच्या ट्रेंडिग यादीत नंबर १ वर आहे. या गाण्यात संजूच्या आयुष्यातील कठीण काळ अधोरेखित करण्यात आला आहे.  या कठीण कठिण प्रसंगात संजूला त्याच्या कुटुंबाची साथ कशी मिळाली ? आणि ती  किती मोलाची होती? हे दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

असा आहे ‘संजू’

संजय दत्तची बायोपिक असलेला सिनेमा संजू येत्या २९ जूनला रिलीज होत आहे. या सिनेमात रणबीर कपूरने संजूची भूमिका बजावली आहे. या सिनेमाचा ट्रेलर कधी येणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना असताना गेल्याच आठवड्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. व्यसनाच्या आहारी गेलेला, देशद्रोहाचा आरोप असलेल्या संजय दत्तचे आयुष्य इतर कलाकारांसारखे सर्वसामान्य नव्हते. त्यामुळे हा सिनेमा त्याचे खरे आयुष्य उलगडून सांगणार आहे त्यामुळे संजूच्या फॅन्ससोबतच इतरांनाही या सिनेमात काय असेल अशी उत्सुकता आहे.

पहिल्या गाण्यापेक्षा हे गाणं बरं

संजूचा ट्रेलर आल्यानंतर आणि तो अनेकांना आवडल्यानंतर त्यातील गाणी चांगली असतील अशी अपेक्षा होती. पण पहिलेच गाणे रिलीज झाल्यावर ‘ हे काय?’ असा प्रश्न अनेकांना पडला. रेट्रो स्टाईलमध्ये हे गाणे शूट करण्यात आले होते. या गाण्यात सोनम कपूर आणि रणबीर कपूर आहे.

- Advertisement -

पहिल्या गाण्यापेक्षा हे गाणं बरं

संजूचा ट्रेलर आल्यानंतर आणि तो अनेकांना आवडल्यानंतर त्यातील गाणी चांगली असतील अशी अपेक्षा होती. पण पहिलेच गाणे रिलीज झाल्यावर ‘ हे काय?’ असा प्रश्न अनेकांना पडला. ‘मे भी बढिया तू भी बढिया’ रेट्रो स्टाईलमध्ये हे गाणे शूट करण्यात आले होते. या गाण्यात सोनम कपूर आणि रणबीर कपूर आहेत. आणि हे गाणं सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे. या गाण्याचा व्हिडिओ रिलीज झाल्यानंतर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हे गाणं आवडले होते. तर काहींना हे गाणं खूपच रटाळ वाटले होते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -