घरताज्या घडामोडीशाहरुख कधी भेटला तर त्याला जिवंत जाळेन, संत परमहंसांची धमकी

शाहरुख कधी भेटला तर त्याला जिवंत जाळेन, संत परमहंसांची धमकी

Subscribe

बॉलिवूड बादशाह शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरून सुरू असलेला वाद थांबण्याचे काही नावच घेत नाहीये. NHRCमध्ये बेशरम रंग हे गाणं चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता अयोध्येच्या एका संतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या चित्रपटाला विरोध करत संत जगद्गुरु परमहंस आचार्य महाराजांनी शाहरुख खानला थेट धमकी देत त्याची कातडी सोलण्याची भाषा वापरली आहे.

पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे. हिंदूंच्या भावना दुखावण्यासाठी विचारपूर्वक रणनीती आखून पैसे कमविण्याचा लोकांनी धंदा केला आहे. हा चित्रपट जिहाद आहे. आज आपण शाहरुख खानचे पोस्टर जाळले आहे. ज्या दिवशी शाहरुख भेटेल त्या दिवशी त्याला जिवंत जाळून टाकेन, असं वादग्रस्त वक्तव्य संत परमहंस आचार्य महाराज यांनी केलं आहे.

- Advertisement -

ज्या दिवशी शाहरुख खान मला भेटेल त्या दिवशी त्याची कातडी सोलून टाकीन आणि जिवंत जाळेन. माझी माणसं त्याला मुंबईत शोधत आहेत. जर कोणी त्याला शोधून काढले आणि सनातनी सिंहाने त्याला जिवंत जाळले, तर मी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन. एवढेच नाही तर मी तिन्ही खानांना आव्हान दिलं आहे. पहिलं शाहरुख खान, नंतर आमिर खान आणि तिसरा म्हणजे सलमान खान या तिघांसाठी मी फाशीची शिक्षा ठरवली आहे, असं संत परमहंस म्हणाले.

शाहरुख खानचा धर्म इस्लाम आहे, आजपर्यंत त्याने त्याच्या धर्मावर कोणतीही वेब सिरीज किंवा कोणताही चित्रपट बनवला नाहीये. मी तुम्हाला आव्हान करतो की, त्याने हलालावर चित्रपट बनवावा. तिहेरी तलाक, पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून दाखवावा. पाच मिनिटांत किती तुकडे होतील हे कोणीही मोजू शकणार नाही. हिंदू मानवतावादी आहे हे फक्त त्यांनाच माहीत आहे. त्यामुळे त्यांची चेष्टा करा आणि पैसे कमवा, म्हणूनच आम्ही सर्वांचा आदर करतो, असंही संत परमहंस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ नंतर ‘झूमे जो पठाण’ गाण्यातील फोटो आले समोर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -