घरमनोरंजनशाहरुख ठरला जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता

शाहरुख ठरला जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर ‘पठाण’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. 2018 मधील‘जीरो’चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून शाहरुखचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

नुकतीच जगभरातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शाहरुख खानने चौथा क्रमांक पटकावला आहे. ट्वीटरवर व्हायरल होत असलेल्या ट्विटमध्ये जॉर्ज क्लूनी, जॅकी चॅन आणि टॉम क्रूझ यांना देखील मागे टाकत शाहरुख खान जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

शाहरुखची एकूण संपत्ती

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार, शाहरूख ची एकूण संपत्ती 770 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6 हजार 300 कोटींपेक्षा जास्त आहे.

- Advertisement -

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार ‘पठाण’
25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

 


हेही वाचा :

‘पठाण’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, तासाभरात मिळाले मिलियन व्ह्यूज

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -