घरदेश-विदेशचीन नाहीतर 'हा' देश आहे पाकिस्तानचा कैवारी; प्रत्येक वेळी येतो मदतीला धावून

चीन नाहीतर ‘हा’ देश आहे पाकिस्तानचा कैवारी; प्रत्येक वेळी येतो मदतीला धावून

Subscribe

पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामान करत आहे. पाकिस्तानात सर्वत्र महागाईने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी लोकांना एकवेळचं खाण्यास मिळण्यासही अडचणी येत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणून चीनला ओळखले जाते. चीनकडून पाकिस्तानला मदत मिळते हे देखील वेळोवेळी पाहिले, मात्र चीनपेक्षा पाकिस्तानला सौदी अरेबिया जास्त मदत करत आहे. सौदी अरेबियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला मदत करण्याची घोषणा केली आहे. याआधीही सौदीने पाकिस्तानला मदत म्हणून अब्जावधी रुपयांचे पॅकेज दिले आहे. यासोबत सौदीने पाकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानमधील त्यांची गुंतवणूक 10 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सलमान यांनी सौदी डेव्हलपमेंट फंडला पाकिस्तानला सेंट्रल बँकेतील सौदीच्या ठेवींची रक्कम पाच अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याबाबत अभ्यास करण्यास सांगितले आहे. त्यांनी यापूर्वी 2022 मध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये सौदी अरेबियाने सेंट्रल बँकेत जमा केलेल्या रोख रकमेत वाढ केली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी डिफॉल्टची शक्यता फेटाळून लावली होती. सोबतचं सौदी अरेबिया लवकरच नवीन कर्ज देणार असून त्याबाबत चीनशीही चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर सध्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यातच ते सौदी अरेबियाला गेले होते. जिथे सोमवारी त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली.

मागील वर्षी सौदी अरेबियाने पाकिस्तानला तेलासाठी दिलेली आर्थिक मदत दुप्पट करण्याची घोषणा केली होती. त्याच वेळी 4.2 अब्ज डॉलरच्या चालू कर्जाच्या परतफेडीची तारीख देखील वाढवली होती. सौदीने मागील कर्ज करारानुसार, डिसेंबर 2021 मध्ये स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये तीन अब्ज डॉलर्स जमा केले होते. त्याच वेळी, ऑक्टोबर 2021 मध्ये त्यांनी पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्सची मदत केली. ही मदत स्वस्त कर्ज आणि उधार तेलाच्या स्वरूपात होती.


सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य; मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -