घरमनोरंजन'वडील म्हणाले होते, जो स्वतंत्र भारत देतोय तो तसाच ठेव..', शाहरुखचा जुना...

‘वडील म्हणाले होते, जो स्वतंत्र भारत देतोय तो तसाच ठेव..’, शाहरुखचा जुना इंटरव्ह्यू व्हायरल

Subscribe

भारतरत्न ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अभिनेता शाहरुख खाने मुस्लिम धर्मपद्धतीनुसार दुवा मागितल्याने चांगलाच चर्चेत आला. शाहरुखने दीदींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना (फातिहा पठण) केले आणि फुंकर घातली. मात्र अभिनेत्याने दुआ मागत घातलेली फुंकर अनेकांना खटकली आहे. यावरून अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांनी सोशल मीडियावर शाहरुख खान लता दीदींच्या पार्थिवावर थुंकला असे म्हणत त्याच्याविरोधात टीकेची झोड उठवली. परंतु काही युजर्संनी शाहरुखला पाठिंबा देत आपण भारतीय असल्याचा गर्व असल्याचे मत व्यक्त केलेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raghav Juyal (@raghavjuyal)

- Advertisement -

धर्माच्या आधारावर लोकांनी शाहरुखला कितीही वेळा ट्रोल केले, पण अभिनेत्याने या गोष्टींकडे कधीच लक्ष दिले नाही. भारत देशावरील प्रेमाचा दाखला त्याने आजवर अनेकदा दिला आहे. याचा पुरावा म्हणजे अभिनेत्याच्या जुन्या मुलाखती. ज्यामध्ये त्याने देशाविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे.

याच दरम्यान शाहरुखच्या अशाच एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या वडीलांनी भारताच्या स्वातंत्र्यबद्दल सांगितलेल्या गोष्टींना उजाळा दिला आहे. यात शाहरुख म्हणतोय की, ‘मला आठवतं आम्ही लहान असताना ‘माझा देश भारत’ असा निबंध वाचायचो, मला वाटतं हे बदलायला हवं, ‘भारत हा देश आहे आणि आम्ही त्याचे रहिवासी आहोत’ आम्ही या देशाचे मालक नाहीत. मालकी हक्क म्हणजे फक्त भारत देश आपला आहे असं नाही तर या देशासाठी आपण काय करायचं आहे हा आहे. आणि त्या संदर्भात आपण देशद्रोही, समाजद्रोही अशी कितीही मोठी नावं दिली तरी चालेल. शेवटी असे लोक आहेत जे स्वतःला भारताचा भाग मानत नाहीत.

- Advertisement -

“मला खूप वाईट वाटत आहे कारण माझ्या कुटुंबानेही या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे, त्यामुळे माझ्यासाठी हे आणखी वाईट आहे कारण हे लोक भारताचा नाश करत आहेत. ‘जेव्हाही मी अशा बातम्या वाचतो तेव्हा मला वाईट वाटते, मला माझ्या वडिलांचे शब्द आठवतात. ‘माझे वडील म्हणाले होते मी तुला स्वतंत्र भारत देत आहे तो तु तसाच स्वतंत्र ठेव.” अशी आठवण शाहरूखने सांगितली.

शाहरुखने 1997 मध्ये एका इंटरव्ह्यूमध्ये हे सांगितले होते. यात त्याने पुढे म्हटले होते की, त्याचे वडील स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्वात तरुण लोकांपैकी एक होते. आज लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी जेव्हा शाहरुख खान व्यवस्थापक पूजा ददलानीसोबत त्याचा धर्मानुसार श्रद्धांजली वाहताना दिसला, तेव्हा भारतीयांची छाती अभिमानाने उंचावली. शाहरुख एका बाजूला मुस्लीम धर्मानुसार हात पसरवून दुवा करताना दिसला तर दुसऱ्या बाजूला पूजा हात जोडून प्रार्थना करताना दिसली. या फोटोवर अनेकांनी ‘ये है अपना भारत’ असे अभिमानाने म्हटले आहे.


Apurva Nemlekar: दाक्षिणात्य लूकमध्ये अपूर्वाच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते झाले फिदा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -