घरताज्या घडामोडीअभिनेत्री शिल्पा शेट्टी खाते बूट; व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री शिल्पा शेट्टी खाते बूट; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

अलीकडेच शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती बूट खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही पूर्णपणे गोंधळले आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अशातच सध्या एका व्हिडिओमुळे शिल्पा चांगलीच चर्चेत आली आहे. अलीकडेच शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून चाहतेही पूर्णपणे गोंधळले आहेत. वास्तविक पाहता, या व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी बूट खाताना दिसत आहे. पंरतु हा बूट संपूर्णपणे चॉकलेटचा बनवलेला आहे, शिल्पा मोठ्या उत्साहात हा बूट खातेय. इतकेच नव्हे तर हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करत आपल्या चाहत्यांना शूज खाओगे क्या? असा सवालही शिल्पाने केला आहे.

- Advertisement -

या व्हिडिओची स्पष्टता झाल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये एकच हश्या पिकला आहे. याशिवाय अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिचे फिटनेस आणि डान्स व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिचे मोठ्या संख्येने चाहते असून,  १४ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. टिकटॉक या App वरही शिल्पा शेट्टी वेगवेगळ्या स्वरूपाचे व्हिडिओ बनवत असते. टिकटॉकवर सुद्धा चाहत्यांचा मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद शिल्पाला मिळतो. 

शिल्पा शेट्टीचे १३ वर्षानंतर चित्रपटसृष्टीत पदार्पण

तसेच, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एका आगामी चित्रपटामधून पदार्पण करणार आहे. शिल्पा गेले बरेच दिवस टीव्हीवर Reality show करताना दिसत आहे, परंतु ती बर्‍याच दिवसांपासून चित्रपटात दिसली नाही. मात्र आता जवळ जवळ १३ वर्षानंतर ती पुन्हा एकदा ‘निकम्मा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट ५ जून २०२० रोजी प्रदर्शीत होणार आहे. तसेच अभिमन्यू दासानी आणि शिर्ले सेतियासुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी एका वेगळ्या पात्राची भूमिका बजावताना दिसणार आहे. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी सेटवर सर्वांनी शिल्पाचे जोरदार स्वागत केले आहे. याचबरोबर लवकरच ती ‘हंगामा’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे. सोबतच परेश रावल आणि मीजान जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -