घरमनोरंजनतब्बल 3 आठवड्यानंतर शिल्पा शेट्टी करणार सुपर 'सुपर डांसर 4'च्या सेटवर...

तब्बल 3 आठवड्यानंतर शिल्पा शेट्टी करणार सुपर ‘सुपर डांसर 4’च्या सेटवर धमाकेदार एंट्री

Subscribe

शिल्पाच्या गैरहजेरीत शोमध्ये दर आठवड्याला सेलेब्स गेस्ट्स बनून येत होते.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ( Shilpa shetty) टीव्हीवरील लोकप्रिय डान्स शो ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ (Super Dancer-4) मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसली होती. मात्र पती राज कुंद्राच्या (raj kundra) अटकेनंतर काही दिवसांपासून शोमधून शिल्पा शेट्टी गायब आहे. पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.(raj kundra pronographya case) यामुळे तिचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आसून तिने शूटींगला देखील जाण्याचे टाळले होते. याचदरम्यान शिल्पा शेट्टी जज करत असणारा सुपर डांसर 4 शोमधून कायमची एक्जिट घेतल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. पण या शोमधून एक नवीनच माहिती समोर येतेय. या वीकेंड एपिसोड शोमध्येही शिल्पा शेट्टी परतणार आहे अशी माहिती शोच्या मेकर्सने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार , “2016 पासून शो सुरू झाला आहे. त्या दिवसापासून शिल्पा शो मध्ये परिक्षकाची भूमिका बजावत आहे. शोचे मेकर्स शिल्पा परतण्याची वाट पाहत आहे. तसेच दुसऱ्या कोणत्याही सेलिब्रिटीला परिक्षक म्हणून ठेवू इच्छित नाही. शिल्पा शोमध्ये कम बॅक करणार आहे हे ऐकून आम्हाला प्रचंड आनंद झाला. आशा आहे की शिल्पा शो संपेपर्यत आमच्या सोबत राहील. तसेच आम्हाला आता दुसऱ्या परिक्षकाचा शोध घ्यावा लागणार नाही. ” ( Shilpa shetty return super dancer set after amid raj kundra pronographya case)

- Advertisement -

शिल्पाच्या गैरहजेरीत शोमध्ये दर आठवड्याला अनेक सेलेब्स गेस्ट्स बनून येत होते.  एपिसोडमध्ये जॅकी श्रॉफ आणि संगीता बिजलानी, करिष्मा कपूर, जेनिलिया डिसूझा,रितेश देशमूख इत्यादी कलाकार गेस्ट म्हणून दिसले होते. आता शिल्पा पुन्हा एकदा परिक्षकाच्या खुर्चीवर विराजमान होत असल्याने स्पर्धकांमध्ये देखील जोश वाढला आहे.


हे हि वाचा – बबड्या आणि शुभ्रा पुन्हा आले एकत्र,चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -