घरमनोरंजनसिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा झाला ब्रेकअप ; एकमेकांना भेटणं केलं...

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचा झाला ब्रेकअप ; एकमेकांना भेटणं केलं बंद

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. परंतु आता या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोघांची जोडी अनेकांना आवडते. त्यांच्या शेरशाह चित्रपटातील जोडीला खूप प्रेम मिळालं होतं. मागील अनेक दिवसांपासून सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु होती. परंतु आता या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या मते, सिद्धार्थ आणि कियारा यांनी त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला आहे.

आता दोघेही एकमेकांना भेटत नाहीत, यांच्या ब्रेकअपची बातमी त्यांच्या चाहत्यांना कळताच, त्यांना खूप मोठ्ठा धक्का बसू शकतो. कारण त्यांच्या चाहत्यांना अशी आशा होती, की इतर सेलिब्रिटींसारखं त्यांचसुद्धा लग्न होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

पूर्वी सिद्धार्थ आणि कियाराच्या रिलेशनशिप बाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू असायच्या, परंतु सिद्धार्थ आणि कियाराने कधीही त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला नव्हता. पण अनेकदा दोघे डिनर डेटसाठी आणि फिरायला जाताना एकत्र स्पॉट व्हायचे.

- Advertisement -

या दोघांच्या नात्याची सुरूवात ‘शेरशाह’ चित्रपटादरम्यान झाली होती. या चित्रपटामध्ये दोघांनी पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा ही भूमिका साकारली होती. आता सिद्धार्थकडे तीन चित्रपट आहेत. ‘योद्धा’ , ‘मिशन मजनू’ आणि ‘थँग गॉड’ या चित्रपटांमध्ये तो दिसून येईल. सिद्धार्थ आता रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसून येणार आहे. कियारा आता लवकरंच ‘भूलभुलैया २’ या चित्रपटात कार्तिक आर्यन सोबत दिसून येईल. हा चित्रपट २० मे रोजी रिलीज होणार आहे. तसेच ती ‘गोविंदा नाम मेरा’ आणि ‘जुग-जुग जियो’ या चित्रपटात दिसणार आहे.


हेही वाचा : ‘तिरसाट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -