घरमनोरंजनSidhu Moose Wala च्या मृत्यूच्या तारखेचं 'या' गाण्यांशी खास कनेक्शन? कसे ते...

Sidhu Moose Wala च्या मृत्यूच्या तारखेचं ‘या’ गाण्यांशी खास कनेक्शन? कसे ते वाचा

Subscribe

29 मे रोजी सिद्धू मुसेवाला यांची काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.

संगीतविश्वाचा एक तेजस्वी दिवा आता कायमचा विझला आहे. 29 मे रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाची (Sidhu Moose Wala)  काही अज्ञातांनी गोळीबार करत हत्या केली, यात 28 वर्षीय प्रतिभावान गायकाने (Sidhu Moose Wala hit songs) जगाचा कायमचा निरोप घेतला. राज्य सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून घेताच दुसऱ्या दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात मूसेवालाची हत्या झाली. त्याच्या हत्येनंतर आता देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Sidhu Moose Wala songs)

‘या’ गाण्यांशी जोडला जातोय मूसेवालाच्या हत्येचा संबंध

आपल्या आवाजाने म्युझिक इंडस्ट्रीत आपली वेगळी छाप निर्माण करणारा सिद्धू मूसेवाला (Punjabi singer Sidhu Moose Wala)  आता आपल्यात राहिला नाही. त्याच्या कायमचे जाण्याने चाहत्यांना नि:शब्द केले. पण तुम्हाला माहित आहे का, सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांनी आता गायकाचा मृत्यू आणि त्याच्या ‘295’ आणि ‘द लास्ट राईड’ (The Last Ride) या गाण्यांचा एक संबंध शोधून काढला आहे.

- Advertisement -

सिद्धू मुसेवालाच्या ‘द लास्ट राइड’ या गाण्याच्या प्रमोशनल इमेजमध्ये एक क्राइम सीन होता ज्यामध्ये बंदूक दिसतेय. त्याचप्रकारे गायकाची खऱ्या आयुष्यातही गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू मुसेवालाचे ‘द लास्ट राईड’ (The Last Ride) हे गाणे त्याच्या यूट्यूब चॅनलवर 15 मे रोजी गायकाच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वी रिलीज झाले हे देखील यातील योगायोग असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान सिद्धू मुसेवालाचे ‘द लास्ट राईड’ हेच गाणं त्याचे शेवटचे गाणे ठरेल. आता आणखी एका योगायोग आहे जो जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.

सिद्धू मूसेवालाने गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याचे ‘295’ (295 song)  या नावाने एक नवं गाणं रिलीज केल होतं. यात सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूची तारीख पाहिली तर तीही 29-5 आहे. 29 तारीख आणि पाचवा महिना.

- Advertisement -

सिद्धूच्या मृत्यूच्या योगायोगावर चाहत्यांनी केल्या अशा कमेंट्स

आता तुम्ही याला योगायोग म्हणाल की आणखी काही… हे तुम्हीचं ठरवा. मात्र या योगायोगावर गायकाच्या चाहत्यांकडून प्रतिक्रिया देत आहेत. या योगायोगाबद्दल सिद्धू मुसेवालाच्या चाहत्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया… (Sidhu Moosewalas date of death)

सिद्धू मूसेवालाचा मृत्यू झाला कसा?

29 मे रोजी सिद्धू मूसेवाला यांची काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांच्यावर AN-94 ने हल्ला करण्यात आला. घटनास्थळावरून AN-94 रायफलच्या तीन राऊंड जप्त करण्यात आले आहेत. या हल्ल्यात आठ ते दहा हल्लेखोर सामील होते, त्यांनी सिद्धू मुसेवाला यांच्यावर 30 हून अधिक राऊंड फायर केल्याचीही माहिती मिळाली आहे.


UPSC 2021 Final Result : यंदाच्या युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी; श्रुती शर्मा देशात पहिली

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -