घरमनोरंजनगाण्यापासून वादापर्यंतचा सोनू निगमचा प्रवास

गाण्यापासून वादापर्यंतचा सोनू निगमचा प्रवास

Subscribe

सोनू निगम हा जगभरात सर्वांचाच आवडता गायक आहे. ३० जुलैला सोनू आपल्या वयाची ४५ वर्ष पूर्ण करत आहे. त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी

बॉलीवूडचा सर्वात प्रसिद्ध गायक म्हणून ओळख असणारा सोनू निगम ३० जुलैला ४५ वर्षांचा झाला आहे. सोनू निगम एक अष्टपैलू गायक म्हणून ओळखला जातो. १९७३ मध्ये हरयाणामध्ये सोनू निगमचा जन्म झाला. वयाच्या ४ थ्या वर्षापासूनच सोनूनं गाणं म्हणायला सुरुवात केली. मोहम्मद रफीची गाणी आपल्या वडिलांबरोबर स्टेजवर सोनू निगम गात असे. सोनू निगमच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. केवळ हिंदीच नाही तर मराठी, तामिळ, तेलुगू, पंजाबी, कन्नड, आसामी, बंगाली चित्रपटांमध्येही सोनूनं गाणी गायली आहेत. सोनूसारखं गाणं म्हणणं हे प्रत्येक गायकाचंच स्वप्नं असतं.

मुंबईत येऊन घेतलं प्रशिक्षण

सोनू निगम वयाच्या १९ व्या वर्षी आपलं नशीब आजमवण्यासाठी मुंबईत आला. सुरुवातीला त्यानं उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे गाण्याचं प्रशिक्षण घेतलं. सुरुवातीच्या दिवसात त्याला बरंच स्ट्रगल करावं लागलं होतं. यावेळी त्यानं अनेक स्टेज शोदेखील केले. सर्वात पहिल्यांदा ‘रफी की याँदे’ या अल्बममध्ये सोनूला गाण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘अच्छा सिला दिया तूने’ या गाण्यानं सोनूला एक वेगळीच ओळख मिळवून दिली.

- Advertisement -

सारेगामा शो मधून पोचला यशाच्या शिखरावर

सोनू निगमनं यानंतर प्रसिद्ध शो सारेगामाचं निवेदन १९९५ मध्ये केला आणि त्यानंतर सोनूचं करिअर यशस्वी झालं. यातूनच त्याला ‘बेवफा सनम’ या चित्रपटासाठी टी सिरीजमधून पहिली संधी मिळाली. मात्र केवळ एका साच्यात न अडकता सोनूनं वेगवेगळी गाणी गायली. फारच कमी कालावधीमध्ये सोनूनं स्वतःला सिद्ध केलं आणि प्रत्येक बाजातली गाणी त्यानं गायली. आजही त्याच्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर भुरळ घालते.

मात्र विवादाशी सोनूचं नातं

प्रसिद्धीच्या शिखरावर आल्यानंतर मात्र सोनू निगमचं विवादाशी नातं जोडलं गेलं. काही असे वाद झाले, ज्यामुळं प्रचंड तणावही निर्माण झाला. एका म्युझिक कंपनीशी वाद झाल्यानंतर सोनूनं तर गाण्यातून संन्यास घेणार असल्याचंही म्हटलं होतं. सर्वात मोठा वाद तर लाऊडस्पीकरवरून अजान देण्यासंदर्भात झाला होता. हा वाद धार्मिक असल्यामुळं सोनू निगमला लोकांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं होतं. दरम्यान काही लोकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -