घरमनोरंजन‘ही’ व्यक्ती घरातच असताना सुशांतने केली आत्महत्या?

‘ही’ व्यक्ती घरातच असताना सुशांतने केली आत्महत्या?

Subscribe

बुधवारी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या करणाऱ्या सुशांतच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्याच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत २५ हून अधिकांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. पोलिसांकडून चौकशी आणि तपास सुरू आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित

या चौकशी दरम्यान बुधवारी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली. यावरून १४ जून रोजी सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याचा मित्र सिद्धार्थ पिथानी त्याच्यासोबत होता असे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ पिथानी सुशांतचा मित्र तर होताच पण त्याचबरोबर तो त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजरही होता. सुशांतने आत्महत्या केल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. काही लोकांच्या मते त्याने आत्महत्या केली नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुशांतने गळफास घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मात्र त्याने असा निर्णय का घेतला असावा, त्याने का असे टोकाचे पाऊल उचलले असेल, याचा तपास वांद्रे पोलिसांकडून सुरू आहे.


सुशांतच्या मृत्यूआधीच केले होते मृत घोषित; पहा विकिपिडिया पेज

‘सुशांतची आत्महत्या नव्हे, तर उशीने तोंड दाबून हत्या’

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपासाला सुरूवात केली आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती पासून त्याच्या जवळचे मित्र, कुटुंबिय या सर्वांची चौकशी पोलीस करत आहेत. दरम्यान, त्याच्या मृत्यूवर अनेक तर्क वितर्क लावले जात असताना सुशांतची आत्महत्या नव्हे तर त्याची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली असल्याचा दावा अॅड. आयुषी यांनी केला आहे. या संबंधीचे ट्विट त्यांनी केले असून यामध्ये दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -