घरमनोरंजनमहात्मा गांधींवर केलेल्या ट्वीटमुळे स्वरा भास्कर आली पुन्हा चर्चेत म्हणाली...

महात्मा गांधींवर केलेल्या ट्वीटमुळे स्वरा भास्कर आली पुन्हा चर्चेत म्हणाली…

Subscribe

दरवेळी वादग्रस्त वक्तव्य करून स्वरा भास्कर चर्चेत असते. आज पुन्हा एकदा सोशल मीडियावर स्वराचीच चर्चा आहे. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वरा भास्करचीच चर्चा आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारी विचारसरणी आजही आपल्या समाजात जिवंत आहे. असे ट्वीट स्वराने आजच्या दिवशी केले आहे.

आज महात्मा गांधींजीची ७२ वी पुण्यातीथी आहे. आजचा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. ३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची गोळी घालून हत्या केली होती.

- Advertisement -

 काय आहे स्वराच ट्वीट

स्वराने गांधीजींच्या अखेरच्या क्षणाचे एक पेंटिंग पोस्ट केले आहे. हे पेंटिंग टॉम वट्टाकुझी यांचे आहे. या चित्रात बापूंचा मृत्यू झाल्यानंतरचा क्षण दाखवण्यात आला आहे. हे पेंटींग पोस्ट करत स्वराने आपले मत मांडले आहे. स्वरा म्हणते, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारी विचारसरणी आजही आपल्या समाजात जिवंत आहे. या विचारसरणीकडे न वळता, आपण बापूंच्या पदचिन्हांवर चालूया.”

स्वराच ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत. या आधी CAA विरोधी आंदोलनातील भाषणांमुळे स्वरा चर्चेत आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -