घरमनोरंजनतब्बूला करायचे 'या' कलाकारासोबत काम

तब्बूला करायचे ‘या’ कलाकारासोबत काम

Subscribe

बॉलिवूड जेष्ठ अभिनेत्री तब्बू एका कार्यक्रमादरम्यान आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आहे. तब्बूने रेडीओवरील एका कार्यक्रमादरम्यान हा खुलासा केला आहे.

अभिनेत्री तब्बूने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र तरीही त्यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली आहे. तब्बूला पुन्हा एकदा दिग्गज गीतकार आणि संगीतकार गुलजार यांच्या बरोबर काम करायचे आहे. यापूर्वी तब्बूने ‘माचिस’, ‘हू तू तू’ या चित्रपटांमधून गुलजार यांच्याबरोबर काम केले आहे. मागील अनेक वर्षांपासून गुलजार यांच्याबरोबर काम न केल्यामुळे तब्बूला पून्हा गुलजार यांच्यासोबत काम करायचे आहे. तब्बूने रेडीओ वरील एका कार्यक्रमादरम्यान हा खुलासा केला आहे. “माझ्या कडे गुलजार यांच्यासाठी एक संदेश आहे. कृपया तुम्ही लवकर एक चित्रपट बनवा आणि त्यात मला काम करण्याची संधी द्या. जर तुम्ही मला अभिनेत्री म्हणूनही घेतले नाही तरी चालेल पण सहकारी म्हणून मला त्या चित्रपटात काम द्या.” असे तब्बू म्हणाली. या कार्यक्रमात तब्बू आरजे बनली आहे. कार्यक्रमात आपण केलेल्या विविध भूमिकांची तिने माहिती दिली. भूमिका करताना समोर येणारी आव्हानांबद्दलही तिने सांगितले. नुकताच तब्बू आणि अभिनेता आयूषमान खुराना यांचा ‘अंदाधूंद’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. याचबरोबर ‘हैदर’ आणि ‘फितूर’ या चित्रपटात तब्बूने नकरात्मक भूमिका केली होती.

 

View this post on Instagram

 

1998. Hu Tu Tu #gulzar #vishalbhardwaj

A post shared by Tabu (@tabutiful) on

- Advertisement -

ग्रे शेड भूमिका आवडतात

“अनेक चित्रपटांमध्ये मी अभिनेत्रीची भूमिका केली. मात्र मला ग्रे शेड भूमिका करायला आवडतात. यामध्ये आपण दोन्ही बाजूच्या भूमिका साकारतो. यामुळे तुम्ही ती भूमिका अधिक चांगल्या  रितीने मांडू शकता. मागील काही वर्षांमध्ये मी विविध भूमिका साकारल्या. मी साकारलेल्या भूमिकाच माझी ओळख बनली. मला अशा भूमिका करून आनंद मिळतो.” – अभिनेत्री तब्बू

 

View this post on Instagram

 

@verveindia @thebadlydrawnboy @thehiddenbutton @kritikagill

A post shared by Tabu (@tabutiful) on

 

View this post on Instagram

 

Tell me when will we have a title to our film. #sriramraghavan

A post shared by Tabu (@tabutiful) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -