घरमनोरंजनकिंगखानच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये तैमूरने काढला टॅटू

किंगखानच्या मुलाच्या बर्थडे पार्टीमध्ये तैमूरने काढला टॅटू

Subscribe

तैमूरचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतोय.

करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वांमध्ये प्रसिद्ध तसेच आवडता स्टारकिड्स आहे. बड्या कलाकारांपेक्षा तैमूरच्या चाहत्यांची संख्या प्रचंड असल्याने तैमूरबद्दलची कोणतीही बातमी किंवा फोटो आला की, काही क्षणातच व्हायरल होतो. नुकताच तैमूरचा एक फोटो सोशल मीडियावर सर्वच चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतोय.

- Advertisement -

शाहरूख खानने नुकताच आपल्या लहान मुलगा अबरामचा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीमध्ये सैफ अली खान आणि करिना कपूर खान यांचा लहान मुलगा नवाब तैमूर खान देखील उपस्थित होता. या बर्थडे पार्टीमध्ये तैमूर खूप धम्माल केली. यासोबतच त्याने हाथावर रंगाने टेंपररी टॅटू काढून घेतले. हा टॅटू काढतानाचा तैमूरचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तैमूर हा टॅटूचा खूपच शौकीन आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तैमूर गुलाबी रंगाच्या शर्ट आणि जीन्समध्ये अतिशय गोड दिसतोय.

- Advertisement -

अबराम खानच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त शाहरूख खान आणि गौरी खानने अॅव्हेंजर्स थीम पार्टी ठेवली होती. अबरामसाठी ही ग्रँड पार्टी ताज लँड्स (Taj Land’s End Mumbai) हॉटेलमध्ये ठेवण्यात आली होती. सध्या तैमूर पालकांसोबत लंडनमध्ये आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -